मुख्य सामग्रीवर वगळा

*सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंद घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश*

 इंदापूर:- मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याने त्याचा २२ हजार डॉक्टरांना होणार थेट फायदा. इंदापूर, डॉ. संदेश शहा. सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री, नामदार हसन मुश्रीफ यांनी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालयात दिल्याने त्याचा थेट फायदा सीसीएमपी उत्तीर्ण २२ हजार होमिओपॅथिक डॉक्टरांना होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे होमिओपॅथिक डॉक्टरांनी जोरदार स्वागत केले आहे.
सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंद घ्यावी, कौन्सिल सदस्य संख्या वाढविणे तसेच अधिनियमा तील इतर दुरुस्त्यासंबंधी महाराष्ट्र होमिओपॅथी सल्लागार समितीने केलेल्या शिफारसीनुसार महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट मधे दुरुस्त्या करणे या व होमिओपॅथीच्या इतर प्रलंबित विषयावर दिनांक २५ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री, नामदार हसन मुश्रीफ यांच्या दालनात व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे मुख्य विधिमंडळ प्रतोद अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणजीत सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर सेल चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, महाराष्ट्र शासना च्या होमिओपॅथी सल्लागार समितीच्या अध्यक्ष डॉ. रजनीताई इंदुलकर, सदस्य डॉ. नितीन गावडे, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ.बाहुबली शहा, समिती सदस्य डॉ. सुधीर म्हात्रे, अकोला जिल्हा होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण अग्रवाल,सचिव डॉ. प्रशांत सांगळे,इतर सदस्य तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, प्रधान सचिव श्री धीरजकुमार, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन डॉ.अजय चंदनवाले, अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्य औषध नियंत्रक डी. आर. गहाणेसाहेब,अन्न व औषध प्रशासन उपायुक्त डॉ. संतोष काळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य उपसचिव डॉ. तुषार पवार, कार्यसन अधिकारी अनिल चौरे, एमएमसी प्रबंधक डॉ. वाघमारे, एमसीएचचे मुख्य लिपिक दि.सा.भुयार मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक श्री. आंदळकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम डॉ. बाहुबली शहा यांनी 
सीसीएमपी कोर्स बाबतच्या सर्व कायदेशीर व तांत्रिक बाजूंचा ऊहापोह करून एमएमसी कोणतेही कारण नसताना अडवणुकीचे धोरण अवलंबून एक प्रकारे सरकार व विधी मंडळाला आव्हान देत असल्याचे प्रतिपादन केले. त्यावर मा.मंत्री महोदयांनी एमएमसी प्रबंधकांना विचारले असता त्यांनी कायद्यातील तरतुदी व परिशिष्टात क्रमांक २८ ला सीसीएमपी अर्हतेची नोंद असल्याचे कबूल केले पण कोर्ट केस ७८४७/२०१४ अनिर्णित असल्याने आम्ही नोंद करून घेत नाही असे सांगितले. त्यावर डॉ. बाहुबली शहा यांनी आक्षेप घेत यासंदर्भात कोणत्याही न्यायालयाचा स्थगिती आदेश नसल्याचे सांगितले. तसेच कायदा विधिमंडळाने पारित केल्यानंतर व मा. राज्यपालांनी तो राज्यात लागू केल्यानंतर जोवर कोणतेही न्यायालय असंवैधानिक ठरवून कायदा किंवा त्यातील विशिष्ट तरतुदी रद्द करत नाही किंवा त्याला स्थगिती देत नाही तोवर त्या कायद्याची अंमलबजावणी कुठली ही यंत्रणा रोखू शकत नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यावर मंत्री महोदयांनी न्यायालयीन स्थगितीचा आदेश आहे का असे विचारले असता एम एम सी प्रबंधकांनी असा कोणताही आदेश नसल्याचे मान्य केले व विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागवण्याचे सुतोवाच केले. त्यावर देखील डॉ. बाहुबली शहा यांनी पुन्हा आक्षेप घेऊन ही कालहरण करण्याची क्लृप्ती असल्याचे सांगितले. या क्षणी आमदार रणजीत सावरकर यांनी आक्रमक पणे हस्तक्षेप करून विधेयका वेळी विधी व न्याय विभागाने जे काही मत द्यायचे ते दिले असून नंतर मंत्री मंडळ, विधिमंडळ व राज्यपाल यांच्या संमतीने कायदा अस्तित्वात आला आहे. आता विधी व न्याय विभागाचा यात काहीही संबंध येत नाही असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर मात्र मंत्री महोदयांनी ताबडतोब ऍक्शन घ्या असे निर्देश एमएमसी प्रबंधक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य प्रशासनास दिले. यावेळी इतर प्रश्नावर देखील साधक बाधक चर्चा होऊन ते कालबद्ध पद्धतीने निकाली काढण्याचे निर्देश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रणजीत सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे डॉ. बाळासाहेब पवार, होमिओपॅथी सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. रजनी इंदुलकर,आयुक्त राजीव निवतकर, प्रधान सचिव धीरज कुमार,उपसचिव पवार साहेब, संचालक आयुष वैद्य रमण घुंगराळेकर, उपसंचालक होमिओपॅथी डॉ. स्वानंद सोनार यांचे या बैठकीत वस्तुनिष्ठ व सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल डॉ . बाहुबली शहा यांनी धन्यवाद दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते