इंदापूर
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान चे सचिव श्री. हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दिनांक 22/12/2024 करण्यात आले होते. त्यावेळी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा इ. जिल्ह्यातील 90 शाळांमधून 225 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला होता.ही स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये
घेण्यात आली.
गट -अ 10 वर्षाखालील
गट ब- 11 ते 16 वर्ष
गट क- 17 ते 22 वर्ष
अशा गटातून ही स्पर्धा घेण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. श्रीमंत ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, संस्थेचे विश्वस्त चि. ऋषिकेश ढोले, चि. पृथ्वीराज ढोले, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री. सम्राट खेडकर सर, विद्यानिकेतन कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व चेस बोर्डचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. श्रीमंत ढोले यांनी बुद्धिबळ स्पर्धकांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, खेळ ही शारीरिक व मानसिक क्रिया आहे, कोणत्याही खेळामुळे चपळता वाढत असते व बौद्धिक विकास होत असतो, बुद्धिबळ हा बुद्धीचा खेळ आहे,त्याला पूर्वी चतुरंग म्हणतात असे सांगितले.
*बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे*
*गट अ-*
1)ओम नांदळे -पहिला क्रमांक 3001 ट्रॉफी, प्रमाणपत्र
2) विहान कोंगारी-दुसरा क्रमांक 2001 ट्रॉफी, प्रमाणपत्र
3) सृष्टी मुसळे -तिसरा क्रमांक 1001 ट्रॉफी, प्रमाणपत्र
4) हर्ष जाधव-चौथा क्रमांक 801 ट्रॉफी, प्रमाणपत्र
5) सत्यजित वेठेकर - पाचवा क्रमांक 601 ट्रॉफी, प्रमाणपत्र
6) श्लोक चौंधरी - सहावा क्रमांक 500 ट्रॉफी, प्रमाणपत्र
7) पृथा ठोंबरे -सातवा क्रमांक 400 ट्रॉफी, प्रमाणपत्र
8)रियान जाधव -आठवा क्रमांक 300 ट्रॉफी, प्रमाणपत्र
9)शिवांश धायगुडे -नववा क्रमांक 200 ट्रॉफी, प्रमाणपत्र
10)ओम निरंजन -दहावा क्रमांक 100 ट्रॉफी, प्रमाणपत्र
*गट ब-*
1) सानवी गोरे - पहिला क्रमांक 3001 ट्रॉफी, प्रमाणपत्र
2) साईराज घोडके - दुसरा क्रमांक 2001 ट्रॉफी,प्रमाणपत्र
3) वेदांत मुसळे- तिसरा क्रमांक 1001 ट्रॉफी,प्रमाणपत्र
4) रुद्र फुले-चौथा क्रमांक 801 ट्रॉफी, प्रमाणपत्र
5) अंश खैरे- पाचवा क्रमांक 601 ट्रॉफी, प्रमाणपत्र
6) सोहम कुटे-सहावा क्रमांक 500 ट्रॉफी, प्रमाणपत्र
7) पार्थ पाटील-सातवा क्रमांक 400 ट्रॉफी, प्रमाणपत्र
8) सार्थक राऊत-आठवा क्रमांक 300 ट्रॉफी प्रमाणपत्र
9) श्रीराम राऊत-नववा क्रमांक 200 ट्रॉफी, प्रमाणपत्र
10) श्रेया संदूपटला-दहावा क्रमांक 100 ट्रॉफी, प्रमाणपत्र
*गट क-*
1) शिवकुमार सितारे- पहिला क्रमांक. 3001 ट्रॉफी, प्रमाणपत्र
2)महेश पवार- दुसरा क्रमांक 2001 ट्रॉफी, प्रमाणपत्र
3 चंद्रशेखर झगडे- तिसरा क्रमांक 1001 ट्रॉफी, प्रमाणपत्र
4) गणेश अकोलकर- चौथा क्रमांक 801 ट्रॉफी, प्रमाणपत्र
5) सारिका बावळे-पाचवा क्रमांक 601 ट्रॉफी, प्रमाणपत्र
6)सुरज शिरनामे - सहावा क्रमांक 500 ट्रॉफी, प्रमाणपत्र
7) प्रथमेश शिंदे-सातवा क्रमांक 400 ट्रॉफी, प्रमाणपत्र
8) रितेश चव्हाण-आठवा क्रमांक 300 ट्रॉफी, प्रमाणपत्र
9) सुमित गरगडे-नववा क्रमांक 200 ट्रॉफी, प्रमाणपत्र
10) रोहन पिंपळे-दहावा क्रमांक 100 ट्रॉफी, प्रमाणपत्र
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच सर्व सहभागी विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा. मा. श्री. श्रीमंत ढोले यांनी बुद्धिबळ खेळाविषयी सविस्तर माहिती देत असताना सांगितले की, व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे, तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद दिला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना इतर बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेऊन कलागुणांचा विकास करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच आपल्या ग्रामीण भागातून गुकेश डी सारखे बुद्धिबळपटू निर्माण व्हावेत असा आशावाद व्यक्त केला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हेच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून संस्थेला योग्य दिशेने मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक, मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव साहेब यांच्या प्रेरणेतून विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन संस्थेमध्ये करण्यात येत आहे.
" बुद्धिबळ स्पर्धा" यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.राजेंद्र सरगर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य. श्री. सम्राट खेडकर , सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या