इंदापूर;-भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याची वार्ता खुप दुःखद आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारताची आर्थिक क्षेत्रातील घसरण रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. संकटकाळात देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले
सामान्यातील सामान्य माणसाचा विचार करुन त्याच्यापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. आपल्या अर्थमंत्री व पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी हा विचार तंतोतंत पाळला. भारताचे पंतप्रधान, अर्थमंत्री असताना अतिशय प्रामाणिक कर्तव्य बजावत देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय ग्रामीणआरोग्य योजना,अन्न सुरक्षा पायाभरणी, माहितीचा अधिकार हे निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाले माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाने आज देशाचा चांगला अर्थकारणातला सिंह हरवला आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना..!- भरतशेठ शहा मित्र परिवार इंदापूर
टिप्पण्या