इंदापूर, डॉ. संदेश शहा. जैन समाजाची सर्वांत मोठी संघटना असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो चे राष्ट्रीय अध्यक्षपद पहिल्यांदाच विजय भंडारी यांच्या रुपाने पुण्यास मिळाले आहे. जीतो
अँडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशन अर्थात जेएटीएफ चे अध्यक्षपद देखील पहिल्यांदाच इंदर जैन यांच्या रुपाने पुण्याला मिळाल्याने जीतो पुणे परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
विजय भंडारी व इंदर जैन यांचा हा सन्मान सोहळा कोरेगाव पार्क येथील हॉटेल कोनरॅड सभागृहात संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यास सिद्धीविनायक ग्रुपचे प्रमुख राजेश सांकला, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ विधीज्ञ एस. के. जैन, जीतो अपेक्स चे माजी अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, सकल जैन संघाचे विजयकांत कोठारी, लायन्स क्लबचे द्वारका जालान, जीतो पुणेचे माजी अध्यक्ष अचल जैन, ओमप्रकाश रांका, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, रविराज ग्रुपचे रवींद्र सांकला, लायन्स क्लबचे राज मुच्छाल, जीतो ॲपेक्स च्या संचालक प्रियांका परमार, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदर छाजेड, जीतो पुणेचे उपाध्यक्ष चेतन भंडारी, सकल जैन संघ पुणेचे विलास राठोड, सिद्धी फाउंडेशनचे प्रमुख मनोज छाजेड, युगल धर्म संघाचे मंगेश कटारिया, दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजीव पाटील, जीतो पुणेचे जिनेंद्र लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीतो पुणेचे माजी मुख्य सचिव पंकज कर्नावट व मुग्धा करंदीकर यांनी केले.
“जीतो अपेक्सा च्या अध्यक्षपदी नियुक्ती होणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत जीतो, लायन्स, युगल धर्म संघ आणि इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून मी जे काम करू शकलो त्यामागे माझे सर्व सहकारी, मित्र, परिवार आणि गुरुंचे पाठबळ आहे. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. तुमच्या प्रती मी सदैव कृतज्ञ राहील. यापुढच्या काळात अधिक समाजोपयोगी कार्य करायचे आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे. माझ्यासह इंदर जैन यांनाही सर्वोत्कृष्ट कार्यासाठी संधी मिळाली आहे. तेदेखील उत्तम काम करतील हा विश्वास आहे. येणाऱ्या काळात देशात प्रत्येक १० अधिकाऱ्यांच्या मागे १ जैन अधिकारी असेल असे लक्ष्य ठेवून आपल्याला काम करायचे आहे. याबरोबरच उद्योग व व्यापारात संपूर्ण जगभर नेटवर्क उभारण्याचे लक्ष असून जैन समाज उद्योग व व्यापारात अग्रेसर राहील यासाठी जीतो महत्वाची भूमिका बजावेल. प्रवीणऋषी म.सा. माझी आई, पत्नी भारती, भाऊ चेतन आणि संपूर्ण परिवाराची मला मोठी साथ मिळाली. कुटुंबाची साथ मिळाली तर माझ्या सारखे अनेक विजय भंडारी तयारी होतील असे प्रतिपादन जितो चे राष्ट्रीय अध्यक्ष
विजय भंडारी यांनी केले.
जैन समाज हा अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे राजकारणात आपण फारसे यशस्वी होऊ शकत नाही. परंतु, प्रशासनात आपली अनेक गुणवान मुले काम करू शकतात. या भावनेने जेएटीएफ ची स्थापना झाली. गेल्या १२ वर्षांपूर्वी आपण हे स्वप्न पाहिले आणि ते तेव्हापासून वास्तवात येऊ लागले. आता भारतीय प्रशासन सेवेत आपली अनेक मुले देशसेवा करीत आहेत. मी दिल्लीचा असलो तरी पुणेकरांनी मला स्वीकारले असून मी आता पुणेकर झालो आहे. पुणेकरांनी जे प्रेम आजपर्यंत दिले आहे. त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. येणाऱ्या काळात अधिक समाजोपयोगी काम आपल्याला करायचे आहे. ते आपण सर्व मिळून करू अशी ग्वाही जेएटीएफ राष्ट्रीय अध्यक्ष इंदर जैन यांनी दिली.
विजय भंडारी आणि इंदर जैन या दोन पुणेकरांची जीतोच्या राष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असून त्यांच्या कालावधीत जीतो चे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य दूरदृष्टीचे, अष्टपैलू, महत्वपूर्ण व लक्षवेधी असेल असे मत सिद्धीविनायक ग्रुपचे प्रमुख राजेश सांकला, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ विधीज्ञ एस. के. जैन, जीतो ॲपेक्स चे माजी अध्यक्ष कांतिलाल ओसवाल,भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, लायन्स क्लब चे
द्वारका जालान, जीतो पुणेचे माजी अध्यक्ष
अचल जैन, रविराज ग्रुप चे प्रमुख रवींद्र सांकला, लायन्स क्लब चे राज मुच्छाल, जीतो ॲपेक्स च्या संचालिका प्रियांका परमार,जीतो पुणे चे अध्यक्ष इंदर छाजेड, पुणे सकल जैन संघ
चे विलास राठोड, सिद्धी फाउंडेशन मनोज छाजेड, युगल धर्म संघ चे मंगेश कटारिया, दि पूना मर्चंट्स चेंबर चे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले.
टिप्पण्या