*हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार, अधिकृत घोषणा आज तर दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मेळाव्याचे आयोजन, सूत्रांनी दिली माहिती*
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील दिनांक ४ ऑक्टोबर रोजी तुतारी हाती घेणार असून याची अधिकृत घोषणा दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत तर ७ ऑक्टोबर रोजी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील तसेच कन्या तथा भाजप जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. अंकिता पाटील ठाकरे यांनी मोबाईल वर तुतारीचे स्टेटस ठेवून ते मोबाईल अकाऊंट वर पोस्ट केल्याने हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. यासंदर्भात हर्षवर्धन पाटील उद्या पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
गेल्या आठवड्यात हर्षवर्धन पाटील यांनी वडापुरी ( ता. इंदापूर ) येथे काटी वडपुरी जिल्हा परिषद गट मेळाव्यात बोलताना पितृपंधरवड्यानंतर आपण तुम्ही जो आग्रह धरत आहात, तो निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर पाटील काय निर्णय घेतील याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात होती. परंतु सध्या सुरू असलेल्या घडामोडी पहाता हर्षवर्धन पाटील शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतील या विषयाची फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आज मुंबई हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून कार्यकर्त्यांची भावना त्यांना सांगितली. महायुती कडून हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता महायुती सूत्रानुसार शक्य नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांची चलबिचल सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याचा आग्रह सातत्याने धरला होता. त्यामुळे राजवर्धन पाटील आणि अंकिता पाटील ठाकरे यांनी तुतारीचे स्टेटस ठेवल्याने कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री या निवास स्थानासमोर तुतारी वाजवत जोरदार घोषणाबाजी केली.
हर्षवर्धन पाटील हे कार्येकर्त्यांच्या मनातील निर्णय घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवास स्थानासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे, लाढू आणि मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, लढेंगे जितेंगे, हर्षवर्धन पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी करत तुतारीचा जल्लोष केला. बबलू पठाण, सागर गानबोटे, संतोष देवकर, बापू चंदनशिवे, दादासाहेब पिसे, राजेंद्र पवार, अतुल वाघमोडे, ललेंद्र शिंदे, अशोक खेडकर, अविनाश कोतमिरे, बापू पारेकर, अमोल राऊत, बाळासाहेब भोंगळे, मयूर शिंदे, अनिकेत राऊत आदींनी एकमेकांना पेढे व मिठाई भरवत जोरदार घोषणाबाजी केली.
टिप्पण्या