इंदापूर:-सोमवार दिनांक 15/7/2024 रोजी निमगाव केतकी येथील फुटाणे नगर मध्ये!!विठाई!! हॉस्पिटलचे उद्घाटन प्रवीण बोरा आणि त्यांच्या सौभाग्यवती दिपाली बोरा यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच हेल्थ केअर फार्मा मेडिकल चे उद्घाटन श्री मच्छिंद्र चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती कोमल चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.!!विठाई!! हॉस्पिटलच्या डॉक्टर भाग्यश्री चव्हाण, मेडिकलचे मालक प्रीतम बोरा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजकुमार जाधव शुभेच्छा देताना म्हणाले जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे आपण लोकांची सेवा, गोरगरिबांची सेवा, प्रामाणिकपणे करून त्यांना चांगली सेवा द्यावी ही सदिच्छा , तुम्ही लोकांची सेवा अशीच करत राहो हीच ईश्वरी इच्छा .निरवांगी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर देशमुख यांनी नवीन हॉस्पिटल ला भेट देऊन डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. महादेव चव्हाण सर, उद्योजक अक्षय बोरा, गोरख चव्हाण, पैलवान यश चव्हाण सौ. विद्या राऊत, सौ. राणी घनवट, श्रीमती. नंदाताई सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ते रवी चव्हाण, कांतीलाल शेंडे, नामदेव किरकत, सामाजिक कार्यकर्ते मधुकर भापकर, उद्योजक भारत लाळगे ,शेंडे सर,या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हॉस्पिटलचे आणि मेडिकलचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी निमगाव केतकी, सराफवाडी ,पिटकेश्वर या गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या