मुख्य सामग्रीवर वगळा

*आ. दत्तात्रय भरणे यांचा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तिहेरी षटकार यर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जलसंपदा व वीज वितरण कंपनीला आदेश*

खडकवासला निरा डाव्या कालव्याला उद्या रविवार 21 जुलैपासून सोडले जाणार आवर्तन आवर्तनाबरोबरच उजनी धरणातील कृषी पंपांनाही आठ तास होणार विद्युत पुरवठा*

इंदापूर:- जिल्हा नियोजन समिती पुणे येथील बैठकी दरम्यान आमदार दत्तात्रय भरणे यांनी विविध मागण्या मांडल्या यावेळी सध्या खडकवासला व निरा देवधर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दुसरीकडे मात्र या दोन्ही प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या इंदापूर तालुक्यात पाऊस सध्या झालेला नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील खडकवासला व निरा डावा कालव्याला पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी व तलाव भरण्यासाठी पाणी सोडावे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यावी. अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.  भरणे यांची मागणी विचारात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही

कालव्यांना रविवार  21 जुलैपासून पाणी सोडण्याचे  आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती पंपांना आठ तास वीज देण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या.त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांचा आग्रह पवार यांनी मान्य केल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. त्यामुळे शेतकरी व तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या मागणीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सध्या शेतात उभे असलेल्या पिकांना व नव्याने लागण केलेल्या ऊस पिकांनाही याचा फायदा होणार आहे तसेच या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रात असणाऱ्या गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांना भूमिगत जलस्त्रोत बळकट होऊन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर खडकवासला व नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा आगामी काळातील शेती सिंचनाचा प्रश्न देखील मिटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तसेच याच बैठकीत श्री भरणे यांनी उजनी बॅक वॉटर मध्ये शेतकऱ्यांना सद्या 6 तास वीज पुरवठा दिली जाते.ती 8 तास करणेत यावी.अशी मागणी श्री पवार यांच्याकडे केली असता तात्काळ पालकमंत्री अजितदादा यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यांना आठ तास करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे उजनी धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.आसे मत आ.दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते