मुख्य सामग्रीवर वगळा

*रसायनशास्त्राचे महत्व आणि विद्यार्थ्यासाठी करिअर संधी*:- प्रा. डॉ.जयश्री गटकुळ*

*केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी*
*रसायनशास्त्र म्हणजे काय*
रसायनशास्त्र (इंग्लिश: केमिस्ट्री) म्हणजे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. 
मानवाला पृथ्वीवर 50 दशलक्ष वेगवेगळी रसायने सापडली आहेत किंवा ती बनवली आहेत,
*भारतातील रसायन उद्योग*
भारतातील रसायन उद्योगमध्ये 80,000 पेक्षा जास्त व्यावसायिक उत्पादने समाविष्ट आहेत . मोठ्या प्रमाणात रसायने, ऍग्रोकेमिकल्स, पेट्रोकेमिकल्स, पॉलिमर आणि खतांमध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते.
भारतातील रासायनिक उद्योगांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे जी आर्थिक वाढ आणि तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते. 
*विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी* 
स्पेशलायझेशन (मुख्य विषय) निवड हा निर्णय महत्त्वाचा आहे कारण तो तुमच्या करिअरची दिशा ठरवतो. स्पेशलायझेशन्समध्ये बायोकेमिस्ट्री, जिओकेमिस्ट्री, केमिकल इंजिनीअरिंग, केमिकल फिजिक्स, एनव्हायरमेंटल सायन्स, फॉरेन्सिक्स, फार्माकोलॉजी, टॉक्सिकॉलॉजी, ॲग्रीकल्चरल केमिस्ट्री, फूड टेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर मॉडेलिंग आणि ड्रग डिझाईन आणि रसायनशास्त्रातील कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स यांचा समावेश होतो.
*अकरावी-बारावी नंतर विद्यार्थ्यासाठी पुढे काय?* अकरावी-बारावीमध्ये केमिस्ट्री विषय अनिवार्य असतो. विद्यार्थ्यांना पुढे बीएससी पदवी घेतानाही तो निवडता येतो. बीएससी पदवीनंतर ऑर्गनिक केमिस्ट्री, इनऑर्गनिक, फिजिकल, अनॅलिटीकल आणि बायोकेमिस्ट्री या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनही करता येते. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बीएड, सेट, नेट, पीएचडी झाले तर शाळा आणि कनिष्ठ आणि पदवी - पदव्युत्तर महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज मध्ये शिक्षक ते सहायक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी आहे आणि पीएचडीसाठी प्रवेश घेऊन संशोधनाचे कार्य करू शकता. तसेच पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना युजीसीने बायो अनॅलिटीकल सायन्स, न्युट्रसीटीकल सायन्स, बायो इन्फॉर्मेटीव्ह आदी इनोव्हेटिव्ह अभ्यासक्रमांचे काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थी पदवीनंतर त्यांचा विचार करू शकतात.
इन्स्ट्रूमेंटेशनसारखे काही अँड ऑन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या वेळी कुशल मनुष्यबळ म्हणून प्राधान्य दिले जाते.  
*करिअर आणि रोजगारच्या कोणत्या संधी आहेत?*
अनॅलिटीकल, ड्रग/फार्मास्यूटिक्ल् केमिस्ट्री अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना औषध कंपन्यांमध्ये खूप मागणी आहे. तर ऑर्गनिक केमिस्ट्री केलेल्या विद्यार्थ्यांना केमिकल कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी आहेत. अनेक इंटरनॅशनल केमिकल कंपनी मध्ये विद्यार्थ्यांना वार्षिक तीस ते चाळीस लाखाचे पॅकेज दिले जाते. रसायनशास्त्र विषय घेतलेला विद्यार्थी शासकीय विभाग, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळवू शकतो आणि स्पर्धात्मक परीक्षाअंतर्गत एमपीएससी/यूपीएससी परीक्षा पास झाला तर शासकीय विभागात शासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती होते.
*भारतावर रासायनिक उद्योगांचा प्रभाव*
भारतातील रासायनिक उद्योगांची आर्थिक वाढ आणि तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकाआहे. भारताला इतरांवर अवलंबून न ठेवणारे स्वतंत्र राष्ट्र बनवण्यासाठी कृषी, औषधनिर्माण आणि उत्पादन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...