इंदापूर *एकही लाभार्थी भगिनी वंचित राहणार नाही याची घेतली जाणार खबरदारी त्या साठी गावनिहाय कॅम्प चे आयोजन*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इंदापूर तालुक्यामध्ये यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली असून,शुक्रवार दिनांक 20 जुलै पासून आमदार भरणे हे स्वतःगावागावांमध्ये जाऊन या योजना पोचवणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून या योजनेच्या कामकाजाचा आढावा आमदार दत्तात्रय भरणे सातत्याने घेत आहेत.
याविषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाभार्थी भगिनींना दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे.ही योजना इंदापूर तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी मी स्वतः यामध्ये जातीने लक्ष घातले असून तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाला निर्देश दिले असून गावागावांमध्ये आपण स्वतः जाऊन याविषयीचा आढावा घेणार असल्याचे ते म्हणाले.याकरिता तहसीलदार,गट विकास अधिकारी,मंडळ अधिकारी,विस्तार अधिकारी,ग्रामसेवक,तलाठी,अंगणवाडी सुपरवायझर,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस,सी आर पी,पोलीस पाटील, महा ई सेवा केंद्र,रेशन दुकानदार,आदी यंत्रणा कार्यान्वित असणार आहे.तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खास या योजनेकरिता शून्य रुपयांमध्ये खाते उघडले जाणार असून सुट्टीच्या दिवशीही पिडीसीसी बँक चालू ठेवलेल्या आहेत.त्यामुळे या योजनेचा फॉर्म भरताना महिला भगिनींची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे त्यासाठी गावामधील प्रत्येक प्रमुख पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच,सदस्य,तसेच,कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही केले असल्याचे शेवटी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
*शुक्रवार दिनांक 19.07.2024*
सकाळी 10 वा. सणसर
सकाळी 11 वा. लासुर्णे
दुपारी 12 वा. अंथुर्णे
दुपारी 1 वा. काटी.
दुपारी 2 वा.लाखेवाडी
दुपारी 3 वा.बावडा
*शनिवार.दिनांक 20.07.2024*
सकाळी 8.30 वा.माळवाडी नं 2
सकाळी 9.30 वा. लोणी देवकर
सकाळी 10 वा.पळसदेव
सकाळी 11 वा.भिगवण
*रविवार.दिनांक 21.07.2024*
सकाळी 10 वा.निमगाव केतकी
सकाळी 11 वा.इंदापूर शहर
*सोमवार.दिनांक 22.07.2024*
सकाळी 10 वा.कळस
सकाळी 11 वा.वालचंदनगर
सकाळी 11.30 वा.कळंब
दुपारी 12.30 रेडणी
टिप्पण्या