इंदापूर:-खेळामुळे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होत असतो. नियमित खेळ खेळणे शालेय जीवनात महत्वाचे आहे. त्यामुळे मनाची तंदुरुस्ती, शरीराची तंदुरुस्ती येण्यास मदत होते. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी नियनमित पणे खेळ खेळला पाहिजे.
दिनांक 28 जुलै 2024 रोजी इंदापूर याठिकाणी राज्यस्तरीय कुराश स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी JBVP तील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यस्तर कुराश स्पर्धेत प्रशालेतील एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 3 गोल्ड मेडल / 03 सिल्व्हर मेडल 05 ब्रॉंज मेडल असे एकूण 11 मेडल मिळवत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आणि जेबिव्हीपीची यशाची परंपरा कायम ठेवली.
यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे
*गोल्ड मेडल* 1)पलक भाऊसो काळे 2)गायकवाड रणवीर अमोल 3)गायकवाड युद्धवीर आणासाहेब
*सिल्व्हर मेडल*
1)शिवतेज आपसो पडळकर 2)दिव्यांश हनुमंत गोसावी 3)रुद्र दादासो पिसे
ब्रॉज मेडल
1)प्रतीक्षा नारायण ढोले 2)श्रावणी हनुमंत गोसावी 3)श्रीराज आबा वाघमोडे 4)पृथ्वीराज गणेश पवार 5) प्रणव संतोष कुदळे 6) अमृता आप्पासो पडळकर
सदर विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरीय पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली.
या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.श्रीमंतजी ढोले उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले ,सचिव श्री हर्षवर्धनजी खाडे , मुख्य सल्लागार श्री प्रदिपजी गुरव, तसेच प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.राजेंद्र सरगर, संस्थेचे प्रशाशक तथा विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.गणेशजी पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच क्रिडा शिक्षक शिवराज तलवारे व अविनाश कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
टिप्पण्या