*ऊजणीत सलग दुसऱ्यांदा मत्स्यबीज सोडण्याचे नियोजन आ. दत्तात्रय भरणेंनी केल्याने कटला मासे देऊन सत्कार*
इंदापूर :- उजनी (यशवंत सागर)जलाशयात सलग दुसऱ्यांदा मत्स्यबीज सोडण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करून हजारो गोरगरीब मच्छीमारांचा व्यवसायाला पाठबळ देऊन जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल उजनी जलाशयातील शेकडो मच्छीमारांनी राज्याचे माजी मंत्री, इंदापूर तालुक्याचे आमदार विकासरत्न दत्तात्रय भरणे यांचे शाल श्रीफळ देऊन नव्हे तर कटला जातीचे दोन मोठे मासे देऊन आगळावेगळा सत्कार केला
उजनी जलशात गेले 28 वर्षातून पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या वर्षी 2023 -24 मध्ये पहिल्यांदा मत्स्यबीज सोडले. त्यानंतर 2024 25 साठी सलग दुसऱ्यांदा मत्स्यबीज सोडण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची तरतूद करून, दिशाहीन होऊन अधोगतीला चाललेला मासेमारी व्यवसायाला आर्थिक पाठबळ देत नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचबरोबर उजनी जलाशयातील बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी आणि मत्स्यबीज मत्स्य खाद्याची शिकार करणाऱ्या वरती जलसंपदा विभाग, पोलीस प्रशासन, मत्स्य विभाग यांना कठोरात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामध्ये बाहेरील राज्यातील परप्रांतील मच्छीमार असो स्थानिक मच्छिमार असो किंवा मच्छीमारांचे चुकीचे नेतृत्व करणाऱ्या नेते असो जे चुकीचे कामे करतील त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उभारला जाईल. त्यासाठी सर्व मच्छीमारांनी मासेमारी करताना कायद्याच्या चाकोरित राहून मासेमारी व्यवसाय करावा. उद्या चुकीचे काम करून माझ्याकडे येऊन विनंती कराल मामा मला मदत करा, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. यासाठी सर्वांनी उजनीत सोडलेल्या मासळीचे योग्य प्रकारे संगोपन करून मासेमारी व्यवसायातून भावी पिढी चांगली घडावी व दुसऱ्यांच्या पुढे हात पसरण्यापेक्षा स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा असल्याचे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी बोलताना व्यक्त केले.
उजनीत सलग दुसऱ्यांदा मत्स्यबीज सोडण्याचे नियोजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे यांनी केल्याबद्दल, मच्छीमार नेत्या उज्वला परदेशी,आशा भोई,राहुल भोई, अजोतीचे माझी सरपंच संजय दरदरे, राहुल दरदरे, पत्रकार प्रवीण नगरे उमेश दरदरे, भगवान भोई, युवराज नगरे, बलभीम भोई आदींनी कटला मासा देऊन आमदार भरणे यांचा सत्कार केला..
फोटो:उजनीत सलग दुसऱ्यांदा मत्स्यबीज सोडण्याचे नियोजन आमदार दत्तात्रय भरणेंनी केल्याने त्यांना कटला मासे देऊन सत्कार करताना मच्छिमार कार्यकर्ते..
टिप्पण्या