*भारतीय आयुर्विमा महामंडळा इंदापूर शाखे कडून वृक्षारोपण कार्यक्रमातून पर्यावरण संतुलन करण्याचा संदेश*
इंदापूर, डॉ. संदेश शहा.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने संपूर्ण देशात दिनांक १७ जुलै रोजी "झाडे लावा पर्यावरण वाचवा" या उद्देशाने वृक्षारोपण करण्याच्या सूचना सर्व शाखांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार इंदापूर एलआयसी शाखेच्या वतीने इंदापूर क्रीडा संकुल मध्ये इंदापूर वृक्ष संजीवनी परिवाराच्या सहकार्याने वृक्षारोपण करत पर्यावरण संतुलन करण्याचा संदेश देण्यात आला.
जिंदगी के साथ भी
और जिंदगी के बाद भी
या विचाराचे ब्रीद वाक्य या समान उद्देशाने दोन्ही ग्रुपचा अनोखा योगायोग होऊन संगम होवून पर्यावरण वाचवण्या साठी प्रत्येकाने झाडे लावण्याचा संकल्प केला. त्यानुसार या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले इंदापूर शाखेचे शाखा प्रमुख शशांक धकाते, विकास अधिकारी प्रतिक शिंदे, अक्षय धायगुडे, प्रसाद चिंचकर, राजन शिंगाडे तसेच विमा प्रतिनिधी नितीन सरडे, भारत गायकवाड, प्रशांत दूनाखे, निवृत्त मेजर जयवंत खामगळ तसेच वृक्ष संजिवनी परिवाराच्या सायरा आतार, महिला पोलीस अधिकारी माधुरी लडकत, चंद्रकांत देवकर सचिन पवार, अशोक अनपट व हमीद आतार यांनी विविध डेरेदार वृक्षारोपण करून सर्वांनी तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
टिप्पण्या