मुख्य सामग्रीवर वगळा

*लक्ष लक्ष नेत्रांनी लुटला पालखी रिंगणाचा आनंद सोहळा, भाविकांना ठरली अध्यात्मिक पर्वणी*

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात जगतगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील  गोलरिंगण सोहळा ग्यानबा तुकाराम च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या लक्षलक्ष नेत्रांनी या नयन मनोहर सोहळ्याचा आनंद लुटत संत तुकाराम यांचा जयघोष करत पाऊसाची आळवणी केली.
पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा !!
शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची !!
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी !!
जन्मोजन्मी वारी घडली तया !!
'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषामध्ये हरिनामा चा गजर करत हा सोहळा अध्यात्मिक पर्वणी व सांस्कृतिक आनंद सोहळा झाला. संत तुकोबारायांच्या पालखीने पहाटेच नागवेलीच्या पानासाठी प्रसिध्द असलेल्या निमगाव केतकीतून प्रस्थान केले. विठू नामाच्या गजरात सोहळ्याने दूध पंढरी असलेल्या गोखळी येथील सोनाई दूध संघाच्या सुगंधी दुधाचा पाहुणचार स्वीकारला. यावेळी संघाचे अध्यक्ष दशरथदादा माने, सीईओ विष्णूकुमार माने, संचालक प्रविण माने, किशोर माने, अतुल माने आदींनी दरवर्षी प्रमाणे पालखी सोहळा विश्वस्त यांचा सत्कार केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, सरपंच सौ. रुपाली झगडे, नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, सहकारी, ग्रामस्थांनी वारकऱ्यांना अन्नदान केले. गोखळी तरंगवाडी येथे डॉ. शशिकांत तरंगे, माऊली वाघमोडे, बापू पोळ, गुरुकुल विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ व ग्रामस्थांनी सोहळ्याची सेवा केली. त्यानंतर इंदापूरमध्ये पालखी सोहळ्याचे सवाद्य स्वागत झाल्यानंतर रिंगणस्थळी पालखी पोहचली. त्यानंतर दोन अब्दागिरी, एक गरुडटका अशी अध्यात्मिक ओळख असलेली देहुकर दिंडी तुकोबा रायांचा जयघोष करत रिंगण मैदानात आली. मानाचा जरी पटका असलेली जरी पटका पताका सह संत तुकाराम महाराज यांचा पादुका रथ रिंगण मैदानात पोहोचला. पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी रिंगण सोहळा संपन्न झाला. पालखी रिंगण सोहळ्याचे सुत्रसंचलन सुनील महाराज मोरे, अभिजित महाराज मोरे यांनी केले. रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात तसेच ग्यानबा, तुकाराम असा जयघोष करत रथाचे स्वागत केले. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. नगारखाना प्रदक्षिणा झाल्यानंतर अश्वाची रिंगण पाहणी आणि त्यांनंतर भगवे पथकाचे झेंडेकरी,विणेकरी धावल्यानंतर हंडेकरी व तुळशीवाल्या भगिनी, पखवाजवाले धावले. त्यानंतर पोलीस, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. सुरुवातीला मानाच्या देवाच्या बाभुळगाव अश्वाने प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर देवाच्या बाभुळगाव अश्वाने तसेच   मोहिते पाटील यांच्या अश्वांने प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर दोन्ही घोड्यांनी तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर पालखी मालकांच्या सूचनेनुसार नामदेव चोपदार यांनी टाळकऱ्यांना उडीच्या खेळासाठी निमंत्रण दिले. त्यानंतर पुंडलिक महाराज देहुकर, कान्होबा महाराज देहुकर, चैतन्य महाराज देहूकर, सोहम महाराज देहूकर यांनी ' भाग्याचा उदय, ते हे जोडी संतपाय हा अभंग घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांची विधिवत आरती झाली. त्यानंतर पालखी सोहळा आय टी आय पालखी तळावर विसावला.
रिंगण सोहळा झाल्या नंतर अश्‍वांच्या टापांची माती कपाळी लावण्या साठी भाविकांनी रिंगणाला लावलेल्या संरक्षक काट्यांमधून धावा घेत एकच गर्दी केली. अश्वाच्या टापुंची माती कपाळी लावल्या नंतर धन्य-धन्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्यानंतर मुख्य पालखी ला टाळकरी, वारकऱ्यां नी भजन करत फुगडी, झिम्मा खेळत मानवी मनोरे उभारत व शेवटी उडी घेऊन या अंत्यत प्रभावशाली ऐतिहासिक रिंगण सोहळ्याची सांगता झाली. वारकऱ्यां सह पोलिस, नागरिकांनी फुगडी खेळून या सोहळ्याचा आनंद साजरा केला. श्री समर्थ संस्थेचे अध्यक्ष असलेल्या प्रदीप गारटकर यांची संस्था संचलित मूकबधीर विद्यालयाचे प्राचार्य अमोल उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली विविध संताचा वेश परिधान करून मोबाईल कमी वापरा असा संदेश देत निघालेली दिव्यांग विद्यार्थ्यांची दिंडी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या श्री नारायणदास रामदास हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय सोरटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली विद्यार्थ्यांची पथनाट्य करत काढण्यात आलेली साक्षरता समाज प्रबोधन करणारी दिंडी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
इंदापूर नगरपालिकेने यंदा चांगल्या पद्धतीने शहरात भव्य स्वागत कमानी उभारुन तसेच वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता, रिंगणस्थळी सुशोभीकरण अशी सर्व जय्यत तयारी केली होती. महसूल आणि पोलीस प्रशासनानेही  पालखी सोहळ्याकरिता उत्तम नियोजन केले .पण पालखी तळावर कच खडी टाकल्याने व ती कोमल पायाला टोचल्याने  भाविकामध्ये राजी व्यक्त केली, 

यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, कर्मयोगी  शंकरराव पाटील सह.साखर कारखाना उपाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा,बापूराव जामदार,राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त सोनाई दूध संघाचे कार्यकारी संचालक विष्णुकुमार माने, नीलम सामंत, पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर सुजितकुमार क्षीरसागर, प्रांत अधिकारी वैभव नावडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगराध्यक्षा सौ.अंकिताताई मुकुंदशेठ शहा, मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, प्राध्यापक कृष्णा ताटे,मा.उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,मा.उपनगराध्यक्ष राजेशजी  शिंदे, धनंजय बाब्रस मा.उपनगराध्यक्ष,  राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे जिल्हाउपाध्यक्ष अनिल दादा राऊत,अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष अहेमद रजा सय्यद,  इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र शेटे, दादासाहेब पिसे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, कैलास कदम, धनंजय बाब्रस, पोपट शिंदे, गजानन गवळी, अनिकेत वाघ, स्वप्नील राऊत, अमर गाडे,पोपट पवार, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब ढवळे, सुनील अरगडे, शेखर पाटील, स्वप्नील सावंत, हमिदभाई आत्तार, महादेव चव्हाण सर,अनिताताई खरात, नानासाहेब खरात,यांच्या सह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.दरम्यान तरंगवाडी ते इंदापूर अशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पायी वारी केली.जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीमध्ये माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी तरंगवाडी ते इंदापूर अशी पायी वारी करत इंदापूर येथे पालखीचे सारथ्य केले. त्यांनी मृदंग वाजवत पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.पालखी सोहळ्यात ज्यांनी टाळ वाजविले, त्यांनी टाळाटाळ न करता पालखी सोहळ्याच्या साक्षीने तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे विकास कारण करावे असे आवाहन बाबामहाराज खारतोडे यांनी केले.दरम्यान पालखी सोहळा रिंगण सोहळ्या नंतर थेट आय टी आय पालखी तळावर विसावला. त्याऐवजी रिंगण सोहळ्यानंतर प्रथेप्रमाणे पालखी सोहळा इंदापूर शहर मुख्य बाजारपेठेतून श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये न्यावा, तिथे आरती झाल्यानंतर हा सोहळा जुन्या पुणे सोलापूर महामार्ग, संविधान चौक, शंभर फुटी रस्त्याने मुक्कामासाठी नवीन आय टी आय मुक्कामस्थळी न्यावा अशी मागणी सकल इंदापूरकरांनी केली आहे. पालखी सोहळा मुख्य बाजारपेठेत न आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते