इंदापूर मध्ये झालेल्या भव्य अशा कार्यक्रमात रोटरी क्लब इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष मा.प्रदीप गारटकर,मा.मुकुंदशेठ शहा माजी अध्यक्ष आझाद पटेल तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 31 चे डी जी इ रोटरी संतोष मराठे आणि ए जी दत्तात्रय बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 2024 25 या वर्षासाठीची अध्यक्षपदाची जबाबदारी रोटरीन मोरेश्वर कोकरे यांना देण्यात आले चाळीसहून अधिक सदस्यांनी पदग्रहण केलं 19 बी ओ डी नी शपथ घेतली यावेळी मार्गदर्शन करताना रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांनी रोटरी चे सामाजिक योगदान कार्यकाराची पद्धती आणि ग्रामीण भागातील तरुणांना नेतृत्व करायचे संधी याद्वारे मिळते रोटरी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे सर्व क्षेत्रातील चांगल्या लोकांची शक्ती एक संघटन तयार करून समाजासाठी त्याचा सकारात्मक वापर करण्याचे एक संधी रोटरीच्या माध्यमातून दिली जाते असे सांगितले गतवर्षीचे अध्यक्ष आझाद पटेल यांनी आपल्या सहकाऱ्यांचे दिलेल्या सहकार्याबद्दल आणि चांगलं काम करायची संधी दिल्याबद्दल रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले नूतन अध्यक्ष एडवोकेट मोरेश्वर कोकरे यांनी आपल्या भाषणात एका शेतकरी कुटुंबातून एवढ्या मोठ्या संस्थेत काम करायची संधी दिल्याबद्दल आदरणीय प्रदीप दादा गारटकर तसेच वसंतराव माळुंजकर यांचे आभार मानले सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांना गोरगरिबांना उपयोगी पडेल असे कार्य वर्षभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही दिली,इंदापूर सरडेवाडी शहा तालुक्यातील विविध ठिकाणावरून वेगवेगळ्या सामाजिक संघटनातून शेतकरी बागायतदार व्यापारी वकील माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या रोटरी क्लबचे सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. उपस्थित मित्रपरिवार पाहता एडवोकेट मोरेश्वर कोकरे यावर्षी रोटरी क्लब ची कारकीर्द नक्कीच गाजवणार असे सर्वजण म्हणत होते. यावर्षी सामाजिक कार्याचा रोटरी क्लब चा पुरस्कार जयवंत नायकुडे जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूर यांना देण्यात आलाया सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक रोटरी डायरेक्टर प्रशांत घुले आणि प्रशांत शिंताप यांनी केले.
खजिनदार राजाराम सागर यांनी आभार प्रदर्शन केले
टिप्पण्या