खडकवासला कॅनॉलमधून तरंगवाडी पासून मदनवाडी पर्यंतचे तलाव 100 टक्के क्षमतेने भरून घेणार- हर्षवर्धन पाटील- रविवारी संध्याकाळ पासून पाणी सोडण्याचा निर्णय
इंदापूर:
खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी पासून ते मदनवाडी पर्यंतच्या सर्व 14 पाझर तलावांमध्ये पाणी सोडून ते 100 टक्के क्षमतेने भरून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी रविवार (दि.21) संध्याकाळ पासून खडकवासला कॅनॉल मध्ये पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (20) रोजी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच कार्यकारी अभियंता कुराडे मॅडम यांच्याशी पाझर तलाव भरून घेणे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी चर्चा केली. त्यानुसार आज शनिवारी दि. 20 व रविवारी दि. 21 अशी 2 दिवस कॅनॉलची स्वच्छता केली जाईल. त्यानंतर कॅनॉलमध्ये रविवारी रात्री पाणी सोडून तरंगवाडी पासून पाझर तलाव भरून देण्यास सुरुवात केली जाईल व तालुक्यातील सर्व पाझर तलाव हे पूर्ण क्षमतेने भरून घेतले जातील. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, काळेवाडी, पळसदेव, लोणी देवकर, न्हावी, रुई, गागरगाव, बळपुडी, बिजवडी(वनगळी), वडापुरी, तरंगवाडी या 14 पाझर तलावांच्या परिसरातील गावांचा फायदा होणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
टिप्पण्या