इंदापूर :- ( सुरेश जकाते यांचे कडून)ब्राम्हण सेवा संघाच्या वतीने परशुराम जयंती उत्साहात संपन्न झाली या निमित्त भगवान परशुरामाच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते
मुख्यबाजार पेठेतील गोसावी विठ्ठल मंदिरातुन पालखीचा प्रारंभ झाला बाजारपेठेतुन ही पालखी शहरातुन मिरवणुकीने पूर्ववत विठ्ठल मंदिरात आणण्यात आली. या ठिकाणी प्रभु श्रीरामा वरील नादातुन नाद र्निमीतो श्रीराम जय राम जय जय राम या गीताचे लेखक जयंत भिडे यांचे व्याख्यान झाले त्यात त्यांनी या गीताची र्निमीतीची कथा सांगितली
ब्राम्हण समाजातील युवक व युवतींनी नोकरीच्या मागे न लगता स्वतंत्र उद्योग व्यवसाय उभारून देशाची सेवा करावी असे आवाहन केले. यावेळी सुत्रसंचलन शिरीष जोशी यांनी केले
यावेळी श्री व सौ अरविंद गारटकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली
डॉ अमोल उन्हाळे केदार गोसावी ॲड प्रसन्न जोशी विनय देशपांडे राजेंद्र जोशी शाम महाजन मोहन गोसावी प्रशांत दुनाखे ॲड अनिरूध्द कुगांवकर प्रसन्न दुनाखे प्रसाद जोशी सौ स्नेहल जकाते सौ रसिका देशपांडे इ कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले
टिप्पण्या