वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यात राजकीय चळवळीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्हे गाव भागात लोकसभेच्या निवडणूकीसाठी एकूण ८ हजार ६५७ पैकी ५ हजार ७२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६६ % चुरशीचे मतदान झाले.
यावेळी वाल्हे गावठाण येथील केंद्र्क्रमांक ३६८ मधून ११२५ पैकी ७०१ केंद्रक्रमांक ६६९ मधून ८४० पैकी ४८५ केंद्र्क्रमांक ३७० मधून ८१७ पैकी ४४४ तर केंद्र्क्रमांक ३७१ मधून ११७७ पैकी ७०३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला ,यासह कामठवाडी येथे ९४६ पैकी ७०६ तर अंबाजीचीवाडी येथे ७२६ पैकी ५१३ ,वागदरवाडीत ६४८ पैकी ३९८ , मोरुजीचीवाडी ७१८ पैकी ५१३ आडाचीवाडी येथे ९१८ पैकी ६८८ तर सुकलवाडी येथे ७४२ पैकी ५७५ मतदारराजांनी आपले मत इव्हिएम यंत्रात बंद केल्याने सरासरी ६६ % मतदान झाले आहे .
यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
टिप्पण्या