(डॉ. संदेश शहा यांचेकडून)पंतप्रधान, गृहमंत्र्यावर टीका करुन काहींना संसदरत्न मिळेल मात्र मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळणार नाही. त्यामुळे पुरस्कारापेक्षा मतदारांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाचा खासदार महायुतीचाच हवा. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती लोकसभा मतदार संघ निवडणुक महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या इंदापूर नगरपरिषद प्रांगणात झालेल्या प्रचार सांगता सभेत श्री. पवार बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात भिगवण व दौंड येथील रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत. या मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आम्ही सकारात्मक दृष्टिकोना तून राजकारण करतो. नकारात्मक दृष्टीने केलेले राजकारण फार काळ टिकत नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व पूर्वीचे विरोधक एकत्र आलो. पाण्याचा प्रश्न सोडवणे, कालव्यातून तालुक्या च्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचावे, बंधा-यांची कामे करावीत असे नियोजन करण्यात आले आहे. विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व आपण निधी देवूच. या खेरीज केंद्रातून ही निधी आणायचा आहे. त्यासाठी केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून जाणे लोकसभा मतदार संघातील तालुक्यांसाठी महत्वाचे आहे. विकासावर मत दिले नाही तर तुमची माझी पुढची पिढी जाब विचारल्याशिवाय रहाणार नाही. सत्तर हजार कोटी रुपयांच्या कथित गैरकारभारा बाबत बहुतेक सर्व शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ह क्लिनचीट मिळाली होती. त्यामुळे विरोधकांनी याचे भांडवल करू नये.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, आपले नीरा देवधर चे पाणी गेले असून हे पाणी पुन्हा न आल्यास आपल्या शेतीचे वाळवंट होईल. नीरा व भीमा नदीतील पाणी, आपले मंजूर पाच टीएमसी पाणी, उजनीच्या पाण्याचे नियोजन गरजेचे आहे. आपले पाणी आणण्याची धमक फक्त अजितदादा पवार यांच्या मध्येच आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यासाठी सुनेत्रा अजितदादा पवार यांना बहुमताने विजयी करा. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, केंद्र व राज्यात निश्चित भाजपची सत्ता येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चित तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व विरोधक एकत्र आलो असून आम्ही तालुक्याचा विकास आराखडा तयार केला आहे. इंदापूर चे पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे सुनेत्रा अजित पवार यांना विक्रमी मताधिक्या ने विजयी करून आपल्या सर्वांगीण विकासास मत द्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई दुधसंघाचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती प्रविण माने, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे आदींची भाषणे झाली.यावेळी पुसदचे आमदार इंद्रनील नाईक, मोहोळचे आ. यशवंत माने, नवनाथ पडळकर, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राजेंद्र तांबीले, कर्मयोगी कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, लाखेवाडीच्या सरपंच व जय भवानीगड विकास प्रतिष्ठान च्या उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा श्रीमंत ढोले मॅडम, समता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नवनाथ रुपनवर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे वर्धमान शहा, बाळासाहेब ढवळे, विठ्ठलराव ननवरे मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस,अशोकराव मखरे सर, अशोक इजगुडे, धनंजय बाब्रस, मच्छिंद्र शेटे, अविनाश कोतमिरे, दादासाहेब पिसे, , राजेंद्र पवार, नाना नरुटे,, दिलीप वाघमारे, दिलीप पाटील उपस्थित होते.
सुत्रसंचलन डॉ. शशिकांत तरंगे यांनी केले.
टिप्पण्या