*अल्पसंख्यांक समाजातील ३ कोटी रुपयांच्या निधीचे श्रेय घेणाऱ्यांनी किती अल्पसंख्यांक युवकांना नोकऱ्या लावल्या:- अंकिता पाटील-ठाकरे*
इंदापूर तालुक्यामध्ये आमदार साहेबांना सतत श्रेय घेण्याची सवय लागली आहे. नुकतेच महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील विविध विकास कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र हा निधी मंजूर होताच आमदार साहेबांची श्रेय घेण्यासाठी धावपळ उडाली आहे. मात्र, माझे आमदार साहेबांना आवाहन आहे की महायुती सरकारमधील निधीचे वाटप श्रेय घेण्याअगोदर आपण तालुक्यातील किती अल्पसंख्यांक युवकांना नोकऱ्या लावल्या हे जाहीर करा असे आवाहन अंकिता पाटील-ठाकरे यांनी केले आहे.
त्यापुढे म्हणाल्या की इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक समाजातील युवकांना स्वर्गीय शंकरराव भाऊ व नंतर हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या माध्यमातून अनेक संस्थांमध्ये नोकऱ्या दिल्या. मात्र या लवकर या दिल्यानंतर कधीच श्रेयाचे राजकारण केले गेले नाही. ना. हर्षवर्धन पाटील साहेब मंत्री असताना तालुक्यामध्ये अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक कामे केली. मात्र त्या कामाचा कधीही गाजा वाजा केला नाही.
मात्र, सध्या तालुक्यात आमदार साहेबांनी वेगळीच सवय लावून घेतली आहे. कारण राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. आणि या सरकारमध्ये सर्व निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरी शिवाय होत नाहीत. परंतु आमदार महोदय सर्व निधी मी आणला असे थोतांडपणे सांगत आहेत.परंतु माझा त्यांना सवाल आहे की आधी तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील सुशिक्षित युवकांच्या हाताला आपण किती नोकऱ्या लावल्या या लोकांना सांगा आणि स्वतःच्या मनाचे आत्मपरीक्षण करा असा खोचक सल्ला अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिला आहे.
टिप्पण्या