मुख्य सामग्रीवर वगळा

*बारामती लोकसभेच्या रिंगणात सामाजिक कार्यातून स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या,परखड भूमिका मांडणाऱ्या ओबीसी बहुजन नेतृत्व-कल्याणी वाघमोडे*


प्रतिनिधी- संपूर्ण महाराष्ट्रभर संघटन असणाऱ्या बारामती तालुक्यातील ढेकळवाडी गावातील इंजिनीयर, ग्रॅज्युएट पदवी प्राप्त अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या व क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात सतत कार्यरत असणाऱ्या,लोकांच्या जनसंपर्कात असणाऱ्या,जागृत लेखिका व परखड महिला नेतृत्व,सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वंचित घटक,कष्टकरी लोकांसाठी आयुष्य समर्पित करून गेली 20 वर्ष संघटनेच्या व चळवळीच्या माध्यमातून सामाजिक न्याय हक्कासाठी वाचा फोडणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचा संघर्ष मोठा आहे.
राजमाता जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपतात. पुढील पिढीला हे विचार जपता यावेत म्हणून अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या परखड शैलीतून,भाषणातून आपले मत मांडत असतात. स्व.बी.के.कोकरे व स्व.गणपत (आबा) देशमुख यांना देखिल प्रेरणा मानतात. तसेच त्यांचा सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या कार्यामुळे चांगला संपर्क आहे. 2019 मध्ये मराठवाडा विभागात शिवसेना पक्षातून स्टार प्रचारक म्हणून संघटनेचा पाठींबा देत कार्य केले होते. अनेक नेत्यांचे प्रचारात सहभाग दिला होता. 2019 च्या लोकसभा निवडणूक मधे वंचित बहुजन आघाडी तर्फे धनगर ओबीसी महिला चेहरा म्हणून त्यांना विचारणा झाली होती परंतु आरोग्याच्या समस्या मुळे त्या मैदानात उतरल्या नाहीत. त्यांचे आजोळ (जन्मगाव) पंढरपूर असून प्रसिद्ध कीर्तनकार स्व. ह. भ.प.नामदेव महाराज टेंभुकर यांच्या त्या नात आहेत. तसेच बारामती तालुक्यांतील निरावागज त्यांचे माहेर आहे. लहानपण व शालेय जीवन सर्व वडील नोकरीस असल्याने भवानीनगर येथील छत्रपती मुलींचे हायस्कूल या ठिकाणी झाले. त्यानंतर बारामती, पुणे, मुंबई,दिल्ली या ठिकाणी त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण झाले. त्या विमानाच्या इंजिनियर असून एक उद्योजिका म्हणून काम करतात.
शालेय जीवनापासूनच नेहमी वक्तृत्व स्पर्धा मधून,निबंध स्पर्धांमधून आपले विचार मांडत असत. आजही महाराष्ट्रात युवती महिलांमध्ये स्त्री-काल,आज आणि उद्या या विषयावर जागृती करत असतात.अनेक जयंती सोहळा मधून परखड महिला वक्ता म्हणून पुढे आल्या.त्या स्वतः महिला नियोजित मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात. खो-खो मधील त्या उत्तम खेळाडू होत्या तसेच कराटे, संरक्षणाचे धडे यातून धाडसी प्रवृत्तीच्या बनल्या.संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर,पुणे,बारामती,पंढरपूर,मुंबई अश्या अनेक ठिकाणी आंदोलने आयोजित करुन समाजाच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या एक परखड महिला नेतृत्व आहेत. धनगर मेंढपाळ प्रश्न,ओबीसी जातनिहाय जनगणना,ओबीसी शिष्यवृत्ती, धनगर आरक्षण , महिला सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांसाठी त्यांनी आंदोलने केलेली आहेत. नुकतेच मुंबई व दिल्ली या ठिकाणी धनगर समाजाला आश्वासने देणाऱ्या व मतांसाठी वापर करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा जाहीर असा निषेध करत आंदोलने गाजवली.
महिला विषयावर जागृती,सुरक्षा,शेतकरी प्रश्न,बेरोजगारी, व्यसनमुक्ती,महागाई तसेच, मेंढपाळ यांचे आरोग्य, रस्ते,शिक्षण यासाठी व आरक्षण आंदोलनातून शासन स्तरावर पाठपुरावा करत असतात. प्रत्येक जिल्ह्या मध्ये संवाद दौरे,बैठका सतत चालू असतात. आजचे धगधगते प्रश्न जसे शेतकऱ्यांचे प्रश्न ( हमीभाव, पाणी प्रश्न, चारा प्रश्न , बी बियाणे, आत्महत्या), महिलांचे प्रश्न, युवकांचे बेरोजगारी, अमली पदार्थ सेवन, कामगार प्रश्न, शैक्षणिक प्रश्न आदींवर गाव भेट दौरे चालू आहेत.
अनेक सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये अहिल्यारत्न, समाजरत्न,महिला रत्न, सुपर वुमन तसेच आदर्श पत्रकारिता अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुरुषांबरोबर महिलांनीही आपल्या बुद्धीचा,क्षमतेचा योग्य वापर करत,देशहितासाठी विकासाच्या मुद्द्यासाठी पुढे आले पाहिजे हा त्यांचा मानस आहे. ९०% समाजकार्य व १० टक्के राजकारण करीत तळागाळातील वंचित बहुजन, दुर्बल घटकाला न्याय मिळवून देत विकासाच्या प्रवाहात आणणे, हेच त्यांच्या जीवनातील अंतिम ध्येय आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते