इंदापूर तालुक्यासाठी आणला पुन्हा एकदा घसघशीत निधी,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल 19 कोटी 45 लाखआमदार दत्तात्रय भरणे इंदापूर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा इंदापूरला घसघशीत निधी प्राप्त झाला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 योजनेतून तालुक्यातील आठ रस्त्यांसाठी तब्बल 19 कोटी 45 लाख मंजूर झाले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे .मागील काही दिवसांपुर्वीच प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार भरणे यांनी कोट्यावधी रूपये आणले होते.त्यानंतर लगेचच तीन महिन्याच्या आतच अजून आठ रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मात्र भरणे यांच्या चिकाटीमुळे मार्गी लागणार आहेत. इंदापूर तालुक्यातील एकूण आठ कामांकरिता 20 किलोमीटर ची लांबी मिळालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच दिवसांपासून या रस्त्यांकरिता निधी मिळावा म्हणून आमदार दत्तात्रय भरणे प्रयत्नशील होते. 1)रामा 120 जांब ते छत...
SHIVSRUSTHI NEWS