इंदापूर:-लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वावरील उतारा म्हणजे ‘ज्येष्ठा गौरी व्रत’ असे मानतात. गौरी पूजनाइतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे. ज्येष्ठा गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्या वेळी दहीभाताचा नवेद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो.
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि जेव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठा गौरी’ असेही म्हणतात.
अशा प्रकारे ज्येष्ठा गौरीची सुंदर आगळी वेगळी सजावट माजी नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई विठ्ठल ननवरे यांच्या इंदापुर येथील भामाई निवास येथे करण्यात आली.
तसेच इंदापूर शहरातील हळदी कुंकासाठी आलेल्या सर्व महिलांनी सजावट पाहुण कौतुक करून आनंद व्यक्त केला.
टिप्पण्या