मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवसृष्टी न्युज लक्ष्मी वैभव न्युज

भारताची जगात प्रतिमा उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी केले -हर्षवर्धन पाटील इंदापूर : प्रतिनिधी  नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वव्यापी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताची प्रतिमा जगात उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी कर्तबगारीने केले आहे. जगामध्ये व देशात नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे, असे गौरवद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत शनिवारी (दि.3) काढले. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी दिली. भाजपने सन 2019 ला देशात 303 जागा जिंकल्या होत्या. तर आता सन 2024 ला भाजपचे 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, तर एनडीए (NDA) एकूण 400 जागा मिळतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपचे सरकार दि. 26 मे 2014 रोजी स्थापन झाले, त्यास आता 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश होत...

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा  इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय *दत्तात्रय (मामा) भरणे* व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आमचे मार्गदर्शक *मधुकर (मामा) भरणे* यांचा वाढदिवस बाब्रस मळा येथे *धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती* तसेच *राजेंद्र चौगुले मित्र परिवार* यांचे वतीने साजरा करण्यात आला. प्रास्ताविक मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस यांनी केले तर आभार माळवाडीचे सरपंच बाळासाहेब व्यवहारे यांनी केले.                यावेळी उपस्थित मंडळाचे विश्वस्त व मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगराध्यक्ष अशोक (नाना) गाणबोटे,  डॉ.अमोल उन्हाळे सर, आंनद मखरे, रामदास चौगुले, माऊली चौगुले, शुभम मखरे, प्रा.धेंडे सर, मनोज पवार, विवेक चौगुले, भारत चौगुले, सुभाष मोरे, समदभाई सय्यद इ. बहुसंख्येने उपस्थित होते.     ...