इंदापूर:- राजमाता जिजाऊंच्या कार्याची दखल जगभरात घेतली जात आहे, ज्या काळात पारतंत्र्य आणि गुलामगिरीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रस्थापितांची हुकूमशाही, मुस्कटदाबी भूमिपुत्रांना सहन करावी लागत होती, अशा काळात मराठी मुलखातील या प्रस्थापितांना उलटून टाकण्यासाठी राजमाता जिजाऊंनी स्वराज्य संकल्प केला आणि शिवरायांद्वारे तो अंमलात आणला, जिजाऊंचे कार्य आणि विचारधारा पुढील पिढीसाठी स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायी आहे" राजमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून महिला विकास करणार असल्याचे मत,सौ.जयश्रीताई खबाले यांनी ग्रामपंचायत शहा ता.इंदापूर येथे व्यक्त केले.हा कार्यक्रम ग्रामपंचायत मध्ये संपन्न झाला, शाळेतील लहान मुलांना खाऊवाटप करून जिजाऊनां अभिवादन करण्यात आले,
या कार्यक्रमास श्री. शंकर तुकाराम कचरे, सौ. जाई सर्जेराव कोळेकर,श्री. रामचंद्र सदाशिव कांबळे,श्री. गणेश पंढरीनाथ मोरे, श्री. परमेश्वर सदाशिव खंदारे, श्री. बबन सावळा कोपनवर, सौ.स्वाती चोपडे, श्री. पोपट सुखदेव कोपनवर, संजीवनी मुरलीधर लावंड, सो. जिजाबाई सीताराम ईजगुडे,भारती सुनील चोपडे,श्री. दशरथ वामन कडवळे
उपस्थित होते.
टिप्पण्या