नामांतराच्या आंदोलनामधील तुरुंगवास भोगलेल्या सलिम शेख व बापूराव जामदार यांचा भव्य सन्मान
इंदापूर : :–
१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्र सेवा दलाच्यावतीने ‘नामांतराच्या आंदोलनामधील तुरुंगवास भोगलेले साथी सलीम शेख, बापू जामदार यांचा सन्मान करण्यात आला.
नामांतर आंदोलनामधील लढवय्ये कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळ्याचे छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्र सेवा दलाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रसेवा दल मंडल सदस्य प्राध्यापक कृष्णा ताटे, पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, सरचिटणीस संदिपान कडवळे, राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष रमेश शिंदे, आर्शद सय्यद, अमोल मिसाळ, ललेंद्र शिंदे, पत्रकार रामदास देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रसेवा दल मंडल सदस्य प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, नामांतर आंदोलनात साथी सलीम शेख यांनी सहा वेळा तर बापू जामदार यांनी एकदा तुरुंगवास भोगला आहे.
टिप्पण्या