प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांच्या शेतातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी
इंदापूर:- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर.आज दिनांक 9/1/2023 रोजी सकाळी नऊ वाजता दक्षिण बावडा विभागाची ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी केली.आज बावडा गावाच्या परिसरामध्ये फिरता दवाखाना ऊसतोड मजुरांच्या मोफत तपासणीसाठी पोहोचला . शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर या कारखान्याची टोळी, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांच्या
शेतामध्ये ऊसतोड चालू होती. तेथे जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी कर्मयोगीचे कर्मचारी श्री प्रकाश काळे साहेब, श्री दादासाहेब कांबळे उपस्थित होते. 68 ऊसतोड मजुरांची तपासणी केली. जवळच असणाऱ्या निरा भिमा सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या टोळ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी उपस्थित कारखान्याचे कर्मचारी चंद्रकांत घोगरे साहेब उपस्थित होते.
कारखान्याचे सभासद. श्रीमती पद्माताई मालोजीराव भोसले. निरा भिमाचे सभासद
श्री प्रसाद आनंदराव पाटील
टोळी मालक. नवनाथ बबन देवकर, किसन संभाजी माने.
या आरोग्य तपासणी वेळी केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर, संजय शेलार सर, केंद्राच्या
डॉक्टर सारंगी निलेश कुंभार. नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्ड बॉय अकतर शेख, या सर्वांच्या मदतीने आरोग्य तपासणी झाली.
टिप्पण्या