स्वामी समर्थ अध्यात्मिक सत्संग मेळाव्याचे आयोजन,
इंदापूर:- मानवी जात सुखी आणि समाधानी झाली पाहिजे या सर्वोच्च मूल्यांची जतन करणारे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रिंबकेश्वर व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे श्री स्वामी समर्थ केंद्र इंदापूर महतीनगर येथे शनिवार दिनांक ७ जानेवारी भव्य अध्यात्मिक सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व अष्टसिद्धी महाशक्ती पिठाचे पिठाधिश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र व गुरुपीठाचे प्रशासकीय प्रमुख युवा संत चंद्रकांतदादा मोरे हे सदर मेळाव्यात उपस्थितांशी अमृततुल्य हितगुज साधणार आहेत. यावेळी मानवी जीवनातील ज्वलंत समस्या यावरती प्रश्न उत्तरे सर्व जाती धर्मातील भाविकांसाठी मोफत विवाह नोंदणी, पर्यावरण विभाग, बाल संस्कार, दुर्गसंवर्धन कृषीशास्त्र, आरोग्यशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विभागाविषयी माहिती तसेच देवघर देव्हारा कसा असावा देवांची मांडणी कशी असावी याविषयी मोफत माहिती व डेमो सहित प्रदर्शन होणार आहे. इंदापूर तालुका व इंदापूर शहर पंचकोशीतील सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा.
यावेळी प्रमुख सेवेकरी प्रदीप भगत, युवराज राऊत, जयकुमार शिंदे, बाबूराव झिंगाडे, विकास खिलारे, शिवतेज दडस, महेश वेदपाठक, युवराज जगताप, गुरुनाथ देवकुळे, सोमनाथ तारगावकर तसेच सर्व महिला व पुरुष सेवेकरी यांच्या उपस्थितीत सर्वांच्या विचाराने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. आसल्याची माहीती विकास बापू खिलारे यांनी इंदापूरात दिली.
टिप्पण्या