इंदापूर;- आ. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्यावतीने ११० सफाई कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीनिमित्त गेल्या वर्षी प्रमाणे या ही वर्षी रोख रक्कमाची दिली भेट
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर नगरपालिकेच्या नवीन इमारती ठिकाणी आ. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्यावतीने ११० सफाई कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीनिमित्त गेल्या वर्षी प्रमाणे या ही वर्षी इंदापूर शहर स्वच्छ करीत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मकर संक्रांतीची रोख रक्कम पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे , शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे ,अक्षय भरणे, मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, वसंत माळुंजकर, मा.नगरसेवक.हरिदास हराळे, गजानन पुंडे, मनोज भापकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले की, शहर स्वच्छ आपण ठेवता म्हणून कुठे ना कुठे उतराई व्हावी या उद्देशाने माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी मकर संक्रातीनिमित्त ११० कर्मचाऱ्यांना रोख रक्कम स्वरूपात भेट देण्यात आली . सदर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या सुखामध्ये भर पडावी म्हणून कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले
टिप्पण्या