मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीने योग सप्ताहाची सांगता 
 इंदापूर:- पतंजली योग परीवार व युवा भारत इंदापूर यांच्यावतीने आयोजित युवा योग सप्ताहातील योग शिबिराची सांगता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करून  करण्यात आली.संत सेवा मंडळ कुर्डुवाडीचे  डॉक्टर जयंत करंदीकर यांनी समारोपाच्या वेळी विज्ञानवादी जीवनात अध्यात्मिक योगाचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे सांगितले, जय इन्स्टिट्यूट नर्सिंगची विद्यार्थीनी कुमारी आकांक्षा दाभाडे या युवतीने 'मी जिजाऊ बोलते ' या विषयावर एकांकिका सादर केली तसेच तीन वर्षाची श्रीमई काटे ही राजमाता जिजाऊंची वेशभूषा करून आली होती, युवा भारत राज्य प्रभारी अतुलजी आर्य यांनी राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने दंड बैठका मगदूल संचलन करत युवकांना प्रेरित केले.
5 जानेवारी पतंजली ट्रस्ट व भारत स्वाभिमान स्थापना दिवस साजरा करून सुरू झालेला योगसप्ताह 12 जानेवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या योगशिबीरामध्ये राज्याचे  माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे,नगराध्यक्ष अंकिता शहा सोनाई परीवाराचे अध्यक्ष दशरथ माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , बी .एम.पी.चे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे, डॉ. लक्ष्मण आसबे यांचे सह विविध राजकीय, सामाजिक, उधोग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर ,तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयातील मुख्य न्यायाधिश पी. एल. पाटील यांचेसह सर्व सहन्यायाधीश, मुख्याधिकारी रामराजे कापरे यांचे सह  इंदापूर नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी ,शहरातील नामांकित डॉक्टर ,वकील,नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते उद्योजक ,जय नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या  सर्व युवती विविध महाविद्यालयातील युवक व युवती सहभागी झाल्या होत्या.त्यांना विविध आसने, प्राणायाम,दिनचर्या, आहार या विषयी तज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरादरम्यान युवा भारत च्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदापूर व गुरुकुल विद्या मंदिर गोखळी येथील विद्यार्थ्यांनाही योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
या योग शिबिरामध्ये इंटिग्रेटेड योगसाधना, यज्ञचिकित्सा रोगांनुसार योग ,प्राणायाम, एरोबिक योगा, सूर्यनमस्कार ,दंड बैठका ,अष्टांग योग ,पंचकर्म षटकर्मा विषयी माहिती सांगण्यात आली, संतुलित आहार, विषमुक्त शेती अशा विविध विषयांचे ज्ञान देण्यात आले .
यावेळी साधकांना दररोज सात्विक   अल्पोपहारही देण्यात आला.या योग सप्ताहातील योग शिबिर यशस्वी करण्यासाठी भारत स्वाभिमान ट्रस्टचे तहसील प्रभारी जयकुमार शिंदे,बिभिषन खबाले सचिन पवार यांचे सह पतंजली योग समितीचे प्रशांत गिड्डे ,मल्हारी घाडगे , रामेश्वर साठे , भालचंद्र भोसले , चंद्रकांत देवकर , काशीनाथ पारेकर , सायराभाभी आत्तार , जयश्रीताई खबाले यांनीअथक परिश्रम घेतले संपूर्ण सप्ताहात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परबत आणि शरद झोळ यांनी केले.आशी माहीती हमिदभाईआतार यांनी आज पत्रकारांना दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते