इंदापूर:-जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ यांची 425 वी जयंती इंदापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. जयश्री भास्कर गटकुळ यांनी "राजमाता जिजाऊंच्या कार्याची दखल जगभरात घेतली जात आहे, ज्या काळात पारतंत्र्य आणि गुलामगिरीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रस्थापितांची हुकूमशाही, मुस्कटदाबी भूमिपुत्रांना सहन करावी लागत होती, अशा काळात मराठी मुलखातील या प्रस्थापितांना उलटून टाकण्यासाठी राजमाता जिजाऊंनी स्वराज्य संकल्प केला आणि शिवरायांद्वारे तो अंमलात आणला, जिजाऊंचे कार्य आणि विचारधारा पुढील पिढीसाठी स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायी आहे" असे मत व्यक्त केले.शिवरायांच्या *शिवबा ते छत्रपती शिवराय* अद्भुत प्रवासाची प्रेरणा म्हणजेच राजमाता जिजाऊ आहे. असे मत जिजाऊ ब्रिगेड इंदापूर तालुका अध्यक्ष कल्पना भोर यांनी व्यक्त केले.सामाजिक बांधिलकीतून लिनेस क्लबच्या माध्यमातून नूतन वर्षांमध्ये सामाजिक कार्याचा शुभारंभ राजमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून महिला विकास करणार असल्याचे मत डिस्ट्रिक्ट लिनेस क्लबच्या सचिव उज्वला गायकवाड यांनी व्यक्त केले.सारिका रेडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
टिप्पण्या