गुड माॕर्निंग क्रिकेट क्लब" च्यावतीने भरविण्यात आलेल्या *इंदापूर प्रिमिअर लिग (IPL)* साखळी स्पर्धेमध्ये *श्रीधर बाब्रस* यांचा संघ विजेता
इंदापूर:- "गुड माॕर्निंग क्रिकेट क्लब" च्यावतीने भरविण्यात आलेल्या *इंदापूर प्रिमिअर लिग (IPL)* साखळी स्पर्धेमध्ये *श्रीधर बाब्रस* यांचा संघ विजेता झाला.त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष *श्री.प्रदिपदादा गारटकर* व कर्मयोगी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन *श्री.भरतशेठ शहा* तसेच आयोजक संजय(डोनाल्ड) शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आला.द्वितीय पारितोषिक मस्तान इलेव्हन या संघास तर मॕन आॕफ द सिरीजचा बहुमान श्रीधर बाब्रस संघाच्या अविनाश चव्हाण याने पटकावला.
यावेळी बोलताना प्रदिपदादा गारटकर व भरतशेठ शहा यांनी लवकरात लवकर शहरामध्ये भव्य क्रिकेट स्टेडिअम उभारले जाईल अशी ग्वाही दिली.सुत्रसंचालन आण्णा पवार यांनी केले.यावेळी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, मा.नगराध्यक्ष सुरेश गवळी, विनायक बाब्रस, राजेंद्र चौगुले, निखील बाब्रस, पोपटराव जगताप, शिवाजीराव इजगुडे, बाळासाहेब व्यवहारे, हरिदास हराळे, एकनाथ गारदी, बंडाशेठ दुनाखे, सुभाष खरे सर, स्वप्निल मखरे, प्रशांत शिंदे, जाकिरभाई बेपारी, ललेंद्र शिंदे, मनोज भापकर, अनिल चव्हाण, रमेश बनसोडे इ.बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या