मा.ना.हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसा निमित्तअनावश्यक खर्च टाळुन,पतंजली कडुन वृक्षारोपण ,फळे वाटप..
इंदापूर:- माजी संसदिय कार्यमंत्री मा.हर्षवर्धनजी पाटील यांचा वाढदिवस पतंजलि योग समिती व युवा भारत इंदापूर यांचे वतीने फळे वाटप आणि वृक्षारोपण करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी इंदापूर नगरपालिकेजवळील प्राथमिक शाळा नंबर 1व 2 येथे मोफत सुरु असलेल्या स्थाई योगवर्गातील योगसाधकांनी एकत्रित येऊन मा.हर्षवर्धन पाटील यांच्या 59 व्या वाढदिवसिनिमित्त इंदापूर येथील कस्तुरबाई बोर्डींग मध्ये विद्यार्थ्यिंना केळी सफरचंद फळांचे वाटप केले .. तसेच वस्तीगृहाच्या आवारात जांभुळ चिंच इतर औषधिय झाडांची लागवड करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्च टाळुन वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी योगदान देत हर्षवर्धनजी पाटील यांना शरद झोळ,राजेंद्र चव्हाण ,प्रशांत गिड्डे,सायरा आतार, जयश्री खबाले, नितीन सावंत यांनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले त्याबरोबर सर्व योगसाधकांनी विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला.
यावेळी पतंजलि योग परीवाराचे मार्गदर्शक सामाजीक कार्यकर्ते हमीदभाई आतार ,चंद्रकांत देवकर,किसन पवार, बिभिषण खबाले ,प्रकाश बलदोटा,मल्हारी घाडगे सुनिल देवळालीकर ,राजेंद्र चव्हाण, संपत घाडगे,देवराव मते काशीनाथ पारेकर सुनिल शिंदे ,युवा भारतचे प्रभारी प्रशांत गिड्डे,सचिन पवार,रविंद्र परबत ,शरद झोळ,आण्णासाहेब चोपडे,ज्ञानु डोंगरे, मेजर रामेश्वर साठे,डाॅ विक्रम पोतदार,अभिजीत पाटील,नितीन मस्के, मेजर बाजीराव शिंदे , नितीन सावंत बोर्डींगचे अधीक्षक दिपक राखुंडे महिला योग समितीच्या प्रमुख सायराभाभी आतार,जयश्रीताई खबाले यांचेसह बहुसंख्य योगसाधक उपस्थित होते.
टिप्पण्या