इंदापूरात बाराशे नव्वद पासून आज पर्यंत गोकुळाष्टमीची प्रथा अखंडित चालू,आजही धुमधडाक्यात साजरी
इंदापूर :- श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आणि काल्याचे कीर्तन श्री खबाले महाराज यांचे झाले. दि.२०/८/२०२२ रोजी दु.१ वा. कार्यक्रमाची सांगता झाली. कासार पट्टा येथील श्रीकृष्ण मंदिर हे गोसावी यांच्या मालकीचे असून इसवी सन पूर्व बाराशे नव्वद पासून आज पर्यंत गोकुळाष्टमीची प्रथा चालू असून गोसावी यांची ही चौदावी पिढी हा उत्सव आनंदात करतात, सद्गुरु श्री सज्जन रंजन महाराज यांची संजीवनी समाधी आहे. गेली सातशे वर्षापासून या या मंदिरामध्ये मंदिरात जन्माष्टमी उत्सव उत्सवामध्ये साजरा होतो या उत्सवा निमित्त जन्माष्टमी दिवशी जन्माचा उत्सव साजरा होतो त्यावेळेस इंदापूर परिसरातील असंख्य भावी श्रीकृष्ण मंदिरामध्ये दर्शनाला आणि कीर्तनाला उपस्थित राहतात कीर्तनाचा कार्यक्रम वेळी श्रीकृष्णाचा जन्म उत्सव रात्री बारा वाजता होतो तेव्हा श्रीकृष्णाची आरती होऊन पुढे प्रसाद प्रत्येक भाविकांना दशमी दिवशी काल्याचा महाप्रसाद भाविकास दिला जातो, जन्म अष्टमी उत्सव आनंदामध्ये पार पडतो त्यावेळेस उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो अशा आनंदमयी वातावरणात जन्माष्टमीचा उत्सव पार पडतो या कार्यक्रमासाठी श्री मोहन गोसावी यांच्या यांच्या प्रयत्नातून हा उत्सव पार पडतो.
दिनांक १८/८/२०२२ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण मंदिरा तील श्री.विठ्ठलाच्या मंदिरास कलशारोहनाचा कार्यक्रम श्री.बसवेश्वर नाथ योगी यांच्या शुभहस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम विधी पूर्वक करण्यात आला. मंदिराचे मालक कै. मुरलीधर कृष्णाजी गोसावी कासार पट्टा इंदापूर,श्री मोहन मुरलीधर गोसावी,श्री मुकुंद मुरलीधर गोसावी
श्री महेश मुरलीधर गोसावी,उपस्थित होते, या कार्यक्रमास हमिदभाईआतार सामाजिक कार्यकर्ते इंदापूर, कवी, लेखक महादेव चव्हाण सर व इतर मान्यवर उपस्थित होते,
टिप्पण्या