भिमाई आश्रमशाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा,पोलीस निरीक्षक मा. टी.वाय. मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
*इंदापूर* : ( दि.१५) - येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्य. आश्रमशाळा व मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन तथा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सकाळी ठीक ८:०० वा. साजरा करण्यात आला.
यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. टी.वाय. मुजावर यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे , संचालक राहुल सवणे, गोरख तिकोटे, संजय कांबळे, सेवानिवृत्त सैनिक मधुकर जगताप (पुणे), शिवाजीभाऊ चंदनशिवे,सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण, गोरख चौगुले.मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, उपप्राचार्या सविता गोफणे तसेच शिक्षक,प्राध्यापक, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.तर आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
टिप्पण्या