राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निमगाव केतकी येथे होणार 21 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे धुमधडाक्यात उद्घाटन व भूमिपूजन.....
इंदापूर:-दि. 10 एप्रिल रोजी राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली मौजे निमगाव केतकी येथे 21 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा पार पडणार असून सायंकाळी ठीक 6.00 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोणी देवकर - निमगांव केतकी ते रामकुंड शेटफळ हवेली रस्ता रुंदीकरण रु.9.0 कोटी निमगांव केतकी ते लोणी देवकर रस्त्यावर पूल बांधणे व रस्ता कॉक्रीटीकरण रु. 4.75 कोटी निमगांव केतकी येथील विविध विकास कामे रु.7.66 कोटी अशा विविध विकास कामांचे उद्घाटन व शुभारंभ होणार आहे.
या कार्यक्रमास प्रताप पाटील, प्रवीण माने, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, दिपक जाधव, अतुल झगडे, सचिन सपकळ, प्रशांत पाटील, महारुद्र पाटील, सागर (बाबा) मिसाळ, अभिजीत तांबिले, बाळासाहेब ढवळे, शुभम निंबाळकर, सचिन खामगळ, छायाताई पडसळकर, स्वाती शेंडे, रेहना मुलाणी, बाळासाहेब करगळ, शशिकांत तरंगे, डी.एन. जगताप, समीर मोरे, कालिदास देवकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच दशरथ डोंगरे, दत्तात्रय शेंडे, मच्छिंद्र चांदणे, संदीप भोंग, अतुल मिसाळ, भारत मोरे, तात्यासाहेब वडापुरे, सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच मीनाताई भोंग,सचिन चांदणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
टिप्पण्या