सरडेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात
इंदापूर:- सर्वांच्या सहकार्याने भौतिक जिवाला धैर्य प्राप्त व्हावे ही काळाची गरज लक्षात घेवून सरडेवाडी येथे सालाबादप्रमाणे श्रीराम नवमी निमित्त ह.भ.प. शेरकर महाराज सुरवड व शेषांगर महाराज बोबडे यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे . तरी भाविक भक्तांनी या श्रवण सुखाचा अवश्य लाभ घ्यावा,अखंड हरिनाम सप्ताह व गीता पारायण प्रारंभ शनिवार ९ / ४ / २०२२ स्थळ : - हनुमान मंदिर , सरडेवाडी ता . इंदापूर , जि .पुणे सोमवार ११/४/२०२२ दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा , सकाळी ८ ते ११ गीता पारायण , सायं . ६ ते ७ हरिपाठ , ८ ते १० कीर्तन व १० नंतर हरिजागर होईल . शनिवार ह.भ.प. हनुमंत महाराज भिसे , कांबळेश्वर, इंदापूर तालुका भजनी मंडळ व सकाळी १० ते १२ वा . ह.भ.प. ऋषिकेश महाराज मगर यांचे रामजन्माचे कीर्तन होईल . रविवार दि . १०/४/२०२२ पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ ह.भ.प. शुभम महाराज शितोळे , आळंदी देवाची सोमवार दि . ११/४/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ वा . ह.भ.प. राजाराम महाराज काटे ( भामचंद्र डोंगर श्री क्षेत्र देहू ) यांचे काल्याचे किर्तन होईल . व नंतर समस्त ग्रामस्थ सरडेवाडी यांचा महाप्रसाद होईल . कीर्तनसाथ : - ह.भ.प. विष्णू महाराज काकडे , ह.भ.प. कृष्णा महाराज उगले मृदंगाचार्य : - ह.भ.प. सतिश महाराज कापसे - रविवार दि . १०/४/२०२२ रोजी सायं . दिपोत्सव होईल व सोमवार दि . ११/४/२०२२ रोजी सकाळी ८ ते ९ वा . दिंडी नगरप्रदक्षणा होईल . - आशी माहीती समस्त ग्रामस्थ व हनुमान भजनी मंडळ, सरडेवाडी यांनी दिली,
टिप्पण्या