इंदापूर;- सातारा येथील कुस्ती स्पर्धेतील यशस्वी इंदापूर तालुक्यातील कुस्ती मल्लांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरव,सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्याचे सुपुत्र माऊली कोकाटे यांनी पुणे जिल्हा कडून मॅट विभागात फायनल पर्यंत धडक मारली तर माती विभागातून महारुद्र काळेल यांनी चांगली कामगिरी केली तसेच संतोष गावडे व नामदेव कोकाटे यांनी सुवर्णपदक मिळवले. सातारा येथील कुस्ती स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या गुणवंत खेळाडूंचा दूधगंगा येथे गुरुवार दि. 14 एप्रिल रोजी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा अशी अपेक्षा यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली
कुस्ती मल्ल विद्या महासंघ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पै. युवराज केचे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
टिप्पण्या