मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर :-नगरपरिषद इंदापूर प्रधानमंत्री आवास योजना BLC ( Beneficiary Led Construction - स्वतःच्या जागेवर बांधकाम) घटकाअंतर्गत   309 लाभार्थी हे यादी क्रमांक 2 - (Detailed Project Report - सविस्तर प्रकल्प अहवाल) DPR-2 मध्ये , मंजूर झाले आहेत.

तसेच प्रधानमंत्री आवास योजना (AHP - Affordable Housing in Partnership - भागीदारी तत्त्वावर घरे) घटकाअंतर्गत एकूण 588 लाभार्थी यांना घरकुल मंजूर झालेले आहे. ह्यात इंदापूर शहरात 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असणारे भाडेकरू तसेच बांधकाम परवानगी मिळण्यात वादग्रस्त जागा असल्यामुळे अडचण असणारे किंवा लाभार्थ्यांची स्वतःची पसंती असणारे असे सर्व लाभार्थी सामावले आहेत.असे यावेळी भरणे यांनी माहिती दिली.
यामध्ये 588 घरांचा हा भव्य प्रकल्प नगर परिषद हद्दीत नियोजित असून त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम होऊन त्यात सर्व उच्च सुख सुविधा उपलब्ध असणार आहेत. ह्या प्रकल्पात विविध क्षेत्रफळांचे एकूण 48 दुकाने असून त्यामुळे शहरातील लघू व्यावसायिकांना उत्तम व नागरिकांना पूरक अशी व्यावसायिक संधी लाभणार आहे.

दोन्ही प्रकल्प हे 21 मार्च 2022 रोजी गृह निर्माण विभाग, मंत्रालय येथे राज्य स्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती (State Level Sanctioning and Monitoring Committee - SLSMC) ह्यांच्या बैठकीत मंजूर होऊन, 30 मार्च 2022 रोजी केंद्रीय गृह निर्माण मंत्रालय दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंजुरी व सनियंत्रण समिती (Central Sanctioning and Monitoring Committee - CSMC) च्या 60व्या बैठकीत मंजूर झाले असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सदर मंजुरी अन्वये दोन्ही प्रकल्पास प्रति लाभार्थी राज्य शासनाकडून रुपये 1 लाख तर केंद्रीय शासनाकडून रुपये 1.5 लाख असे एकूण प्रति लाभार्थी रुपये 2.5 लाख प्रमाणे एकूण रुपये 22.425 कोटी प्राप्त होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते