इंदापूर:- तालुक्यातील रामकुंड येथे रामनवमीच्या निमित्त साधून निमगाव केतकी येथील राम कुंड येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी राम मंदिरात उपस्थित राहून देवाची आरती केली व रामनवमी निमित्त उपस्थित भावी भक्तांना शुभेच्छा दिल्या व रामकुंड परिसराचा विकासातून कायापालट करण्यास कटिबद्ध राहील अशी ग्वाही देऊन रामकुंड येथील राम मंदिर परिसराचे सुशोभिकरण व संरक्षण भिंती करिता 25 लाख रुपये निधी मंजूर केला जाईल असा शब्द दिला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ वरकुटे गावचे सरपंच बापूराव शेंडे तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर तसेच निमगाव किती पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त उपस्थित होते तसेच रामकुंड मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक उपस्थित होते
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या