*महिला पतंजली योग समिती चा अनोखा उपक्रम*
इंदापूर तालुक्यात निमगाव जवळ खूप मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून यामध्ये विविध प्रकारचे प्राणी पक्षी राहत आहेत सध्या उन्हाळ्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून एकाच वेळेस सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करणे वन खात्यास अडचणीचे ठरत आहे ही बाब लक्षात घेऊन महिला पतंजली योग समितीच्या वतीने संपूर्ण उन्हाळा होईपर्यंत निमगाव नजीकच्या पाणवठयामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम आज महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा सौ मायाताई विंचु श्रीमती राजश्री शिंदे सौ कल्पना भोर सौ अर्चना शेवाळे सौ रेखा विंचू सौ सुवर्णा कासार , सौ सविता बंगाळे, सौ शोभा फासे,सौ निता नलावडे, सौ प्रतिभा गुजराती,सौ सुनीता गलांडे,सौ निर्मला कवितके, सौ,रीना नायर,सौ मंजुताई गोडगे,सौ छाया बोराटे इ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी मायाताई विंचू म्हणाल्या की समितीच्या वतीने महिलांच्या संदर्भातील विविध उपक्रम नेहमीच केले जातात परंतु एक निसर्गाच्या प्रती आपण सर्वजण काही ना काही देणं लागतोय या भावनेतून पानवठया मध्ये पाणी सोडणेचा शुभारंभ आज करण्यात आला या समितीस मार्गदर्शक श्री दत्तात्रेय अनपट श्री मदन चव्हाण श्री भागवत भाऊ गटकुळ यांचे नेहमीच सहकार्य व साथ मिळते
टिप्पण्या