इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 7/3/2022 रोजी कालठण नंबर 1 परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करतेवेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर बिजवडी कारखान्याचे संचालक श्री हनुमंत जाधव साहेब त्यांच्यासमवेतश्री. गोरख पाडूळे माजी सदस्य विकास सोसायटी कालठण, श्री संतोष पाडूळे साहेब, माजी उपसरपंच कालठण, श्री संजय माने पत्रकार साहेब, श्री अमोल कदम ग्रामपंचायत सदस्य कालठण , श्री सपकळ रणजीत, श्री बबन चोरगे, श्री सुनील करे ,श्री प्रकाश पाडूळे श्री नवनाथ बनसोडे श्री विशाल वाघमोडे श्री बबन चव्हाण श्री अविनाश शिंदे ,श्री हनुमंत जगताप सर ,श्री दिनकर जगताप उपसरपंच कालठण न नंबर एक, कर्मयोगी चे अधिकारी श्री धनाजी पाटील साहेब, श्री आप्पासाहेब व्हेलगडे, यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे ,नर्स पूजा धांदे , तनुजा गायकवाड, वाॅर्डबाॅय नितेश बेटेकर .केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 70 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या