इंदापूर:-अनेक संकटांना तोंड देऊन एकाच हॉलमध्ये पंधरा ते वीस दिवस राहून इंदापूर कालठण येथील डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेले शुभम पाडूळे हे गुरुवारी आपल्या घरी परतले त्यानंतर शनिवार दिनांक सहा रोजी तेजपृथ्वी ग्रुप तर्फे त्याचा सत्कार करण्यात आला
यावेळेस तेजपृथ्वी ग्रुप च्या संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात म्हणाल्या की शुभम ने अतिशय धीराने पाठीमागील 15 ते 20 दिवस काढले .तेथील असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत ही शुभम ने खचून न जाता उलट आपल्या आई-वडिलांना नेहमी फोनवर मी सुखरूप आहे माझी काळजी करू नका असेच सांगून धीर दिलात्याबद्दल मी शुभम चे प्रथम आभार मानते शुभम हा आपले डॉक्टर की शिक्षण पूर्ण करत होता पण ते सोडून त्याला परत यावे लागले परंतू अस्या प्रस्थितीत तो सुखरूप आला हे आपले सर्वांच नशिब मी तेज पृथ्वी ग्रुप तर्फे शासनाला विनंती करू इच्छिते जी मुलं परदेशी आहेत युद्धात अडकले आहेत त्यांना लवकरात लवकर लवकर माय देशाला आणावे वे तसेच ज्या मुलांनी तेथे लाखो रुपये भरले आहे परंतु आज त्यांना अचानक परत ते सोडून यावे लागले मग त्यांनी तेथे भरलेली शैक्षणिक फी ,रूमचे डिपॉझिट हे व ईतर खर्च हे सर्व सोडून परत यावे लागले याचाही शासनाने विचार करून या मुलांना पुढील शिक्षण घेत असतात शासनाने पूर्णपणे सहकार्य करावे तेज पृथ्वी ग्रुप अशा सर्व शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या पाठीशी आहे तसेच इथून पुढे शुभमला कोणतीही अडचण आली तरी तेजीपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून महेंद्रदादा रेडके पांडुरंग मारकड नानासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम ला पूर्ण सहकार्य करु ,यावेळेस तेजपृथ्वी ग्रुप कडून झालेला सत्कार पाहून शुभम चे डोळे पाणावले त्याने तेजपृथ्वी ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानून तेथील काही वाईट अनुभव सांगितले यावेळेस शुभम चे वडील संदीप पाडूळे तेज पृथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे पूजाताई पाध्ये सुधिर पाडूळे ज्ञानेश्वर कदम सुनील लाटे नितीन मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते
टिप्पण्या