इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मौजे कुंभारगाव येथे शनिवारी (दि.१२) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १० कोटी ७७ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन,कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट हे असणार आहेत.
या ठिकाणी डाळज नं. २ व कुंभारगाव ते कोठारी फार्म रस्ता, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता तसेच नियोजित बंदिस्त गटार या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महेश देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सरचिटणीस डी.एन जगताप,पंचायत समितीचे माजी सभापती संजय देहाडे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पप्पू सल्ले, प्रधानमंत्री मत्स्य संपदा समितीचे सदस्य भरत मल्लाव, युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, कार्याध्यक्ष अतुल झगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच सायंकाळी ६ वाजता या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.
टिप्पण्या