महाशिवरात्रीचे औचित्य साधून पुरातन काशीविश्वेश्वर महादेव मंदिराच्या रंगरंगोटी साठी केला साठ हजार खर्च
इंदापूरः तालुक्यातील रेडा गावामध्ये गेली कित्येक दशकापासून पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार सन २००८ साली स्व. सूर्यकांत दगडू गुळवे यांनी लाखो रुपये खर्च करून केला होता.अनेक वर्षापासून पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे रेडा गावात एक जागृत देवस्थान आहे. आपल्या स्व. आजोबाची सामाजिक बांधिलकी वसा, परंपरा ही नातू विक्रांतशेठ गुळवे यांनी पुढे जोपासत चालू ठेवली आहे. त्यांनी काशिविश्वेश्वर मंदिराच्या रंगरंगोटी व टाईल्स फरशी साठी तब्बल ६० हजार रुपये खर्च केला आहे. ही परंपरा या वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिर परिसरात मध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वृक्षारोपण केले.गुळवे परिवाराची ही सामाजिक बांधिलकी रेडा परिसरातील आजूबाजूच्या गावातील व इंदापूर तालुक्यात सुद्धा लौकिक असून धार्मिक ,सामाजिक उपक्रम राबवून बांधिलकी जपणारे कुटुंब , परिवार म्हणून त्यांची ओळख आहे. तीच परंपरा पुढे चालवत आहेत.
वडील सोमेश्वर सूर्यकांत गुळवे चे प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी व प्रगतशील बागायतदार म्हणून ओळखले जातात आणि चुलते अँड. नागेश सूर्यकांत गुळवे पुणे येथे प्रसिद्ध वकील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम, कार्यक्रम राबवत असतात.या वृक्षारोपणासाठी विक्रांतशेठ गुळवे, रेडा ग्रामपंचायत सदस्य धनंजय गायकवाड, रेडा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन , माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर देवकर, महादेव रघुनाथ देवकर - पाटील , धीरज देवकर ,सुशांत देवकर ,अशिष देवकर, श्रीपाद साखरे, हनमंत कोळेकर, गणेश वाघ, आदित्य मोहिते, नागेश कानगुडे, योगेश ज्योतीराम देवकर, भैया मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
--------
चौकट:-
*वृक्षारोपण ही काळाची गरज - विक्रांतशेठ गुळवे*
सध्या जागतिक पर्यावरण समतोल ढासळत चाललेला असून जगाला समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऐनवेळी पाऊस आणि दुष्काळ असे अनेक सध्या अनुभव नागरिकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मानवी जीवनावरती विपरीत परिणाम होत आहेत. निसर्ग समतोल जपला किंवा निसर्गाला जोपासलं तर मानवी जीवन समतोल राहील आणि मानवाचे जीवन ही सुरक्षित राहील.त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे असे मत त्यांनी आपले व्यक्त केले. विक्रमशेठ गुळवे यांच्या संकल्पनेतून व बाबुराव पवार यांच्या सहकार्यातून विविध प्रकारच्या पन्नास झाडांचे वृक्षारोपण करून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
------------
टिप्पण्या