शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 64 ऊस तोडणी मजुरांची तपासणी - महादेव चव्हाण सर
इंदापूर:- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 17/3/2022 रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील माळवाडी नंबर 1 शिरसोडी या गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी उपस्थित शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे ऍडमिन श्री दीपक जगताप सर, हमीद भाई आतार सामाजिक कार्यकर्ते, कर्मयोगी चे कर्मचारी शिरसोडी.अ विभागाचे प्रमुख श्री अशोक भोंगळे साहेब, श्री बोंगाणे पांडुरंग साहेब, श्री नरूटे शिवाजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे, नर्स पूजा धांदे, तनुजा गायकवाड, केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर आणि श्री संजय शेलार सर या सर्वांचे उपस्थितीमध्ये 64 ऊस तोडणी मजुरांची तपासणी करण्यात आली.
टिप्पण्या