इंदापूर:- मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि लिनेस क्लब इंदापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा साडी, श्रीफळ, पुष्गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.*अतिसामान्यतील असामान्य अशा कष्टकरी महिला कठीण परिस्थितीशी झगडत आत्मविश्वसाने यशाचा मार्ग शोधतात. अशा महिला धैर्याने सामोरे जात असामान्य कर्तृत्व सिद्ध करत महान नारीशक्तीची अस्मिता जागृत करून रणरागिणी, यशस्विनी, तेजस्विनी म्हणून समाजासमोर येतात... आजच्या काळात आपल्या मुलांसाठी जिवाची पर्वा करता अहोरात्र कष्ट करणारी महिला खऱ्या अर्थाने हिरकणी ठरते* असे मत प्रा जयश्री भास्कर गटकुळ यांनी व्यक्त केले
*कष्टकरी नारीशक्तीचा सन्मान करून तीच्या जिद्दीला आणि कर्तुत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम आमच्या हातून घडत आहे हे आमचे भाग्य आहे* असे मत लिनेस क्लब अध्यक्षा सौ. उज्वला गायकवाड यांनी व्यक्त केले
*जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड,लिनेस क्लब इंदापूर यांच्या वतीने कष्टकरी महिला सौ रुक्मिणी काळे यांचा सन्मान केला.*
जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा प्रा. जयश्री गटकुळ, मराठा सेवा संघ पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल घोगरे, लीनेस क्लब इंदापूर तालुका अध्यक्षा सौ. उज्वला गायकवाड, जिजाऊ ब्रिगेड इंदापूर शहर अध्यक्षा पुजा शिंदे,
प्रमोद जगताप, महेश कोरटकर इंदापूर तालुका कोषाध्यक्ष, प्रमोद देशमुख इंदापूर तालुका कार्याध्यक्ष, सागर जाधव इंदापूर शहर उपाध्यक्ष, महेश वाघ इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख मराठा सेवा संघ, व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अन्य मान्यवर उपस्थित होते
टिप्पण्या