ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व गरजूंना शिलाई मशीनचे वाटप
इंदापूर-नवीन पिढीच्या महिलांमध्ये आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे आजची महिला ही सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. त्यामुळे समाजामध्ये महिलांविषयी आदरभाव वाढला आहे .पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात आज महिलांचे मोठ्या मनाने कौतुक करताना दिसत आहे, असे प्रतिपादन शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील सदस्या, सोलापूर जिल्हा परिषद यांनी ताहेरा फाउंडेशनच्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व गरजूंना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तस्लिम आतार हिने कुरानच्या पवित्र आयत पठणाने केली. फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकर तांबोळी यांनी प्रास्ताविक करताना फाउंडेशनने राबवलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली व फाउंडेशनला सहकार्य करणाऱ्या वर्गणीदारांचे आभार मानले. कर्तुत्ववान महिला मध्ये राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, घरगुती कुटीर उद्योग करणाऱ्या महिला यांचा सन्मान शितल देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कर्तुत्ववान महिला मध्ये फातिमा पाटावाला,अनिसा तांबोळी, आलीमा- बाजी,सायरा आतार, बतुल तांबोळी फातिमा मुलाणी, परविन तांबोळी, साजिदा आतार, डॉ. तमिम देशमुख ,दिपाली माने, नियाजबी तांबोळी, रेश्मा तांबोळी, तमन्ना इनामदार ,लतीफा पठाण, शेहनाज बागवान, मारिया बागवान व रेहाना बागवान यांचा समावेश होता.
महिला दिनाचे औचित्य साधून अरिफा खान ,जुलेखा बागवान, राबिया तांबोळी यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सत्कार मूर्ती मधून महाराष्ट्र राज्य महिला बचत गटाच्या उपाध्यक्ष सायरा आतार यांनी मनोगतात ताहेरा फाउंडेशन चे उत्तम कार्याबद्दल आभिनंदन केले तर माजी पंचायत समिती सदस्या फातिमा पाटावाला यांनी आणखी चांगले काम करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास हाजी बशीर भाई तांबोळी, दादाभाई तांबोळी, अर्चना पंधे, अस्लम तांबोळी, जाकीर तांबोळी, शाहिद तांबोळी,शादाब तांबोळी तसेच बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शकील शेख यांनी केले तर आभार इलाही बागवान यांनी मानले.
टिप्पण्या