इंदापूर:- तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी,इंदापूर शहराचे भाग्यविधाते व मनमिळाऊ,कुशल संघटक,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री.प्रदीपदादा गारटकर यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,देताना महारूद्र पाटील मा.तालुकाध्यक्ष इंदापूर, वसंतराव आरडे सरचिटणीस राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टी पुणे जिल्हा,, अमोलशेठ भिसे,माजी जिल्हापरिषद सदस्य, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी बोलताना महारूद्र पाटील मा.तालुकाध्यक्ष म्हणाले की, प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शना तून इंदापुर शहराचा कायापालट झाला आहे,भावी काळात प्रदीप गारटकर यांना अनेक मोठे पद मिळावे आसेही पाटील म्हणाले, या वेळी जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे म्हणाले की, इच्छा शक्ती प्रभळ आसेल तर अवघड काहीच वाटत नाही, गारटकर दादा ला शंभर वर्षे आयुष्य लाभो, हीच प्रार्थना म्हणून शुभेच्छा दिल्या, हा कार्यक्रम महारूद्र पाटील यांच्या भव्य कार्यालयात पार पडला.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या