इंदापूर, : इंदापूर तालुक्यातील अपवाद वगळून
सर्वच रस्ते व विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्याकडून होत आहे. राज्यमंत्र्यांनी इंदापूरकरांना दिलेला विकासाचा शब्द पाळला.
दि.२७ मार्च २०२२ रोजी काटी, रेडा, रेडणी, निरा – भीमा सहकारी साखर कारखाना- काटी रस्ता ,काटी ओढ्यावरील पुल व गिरवी गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजनाचा कार्यक्रम राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते होणार आहे. ही कामे सुमारे २० कोटींची कामे आहेत. यामुळे राज्यमंत्र्यांनी तालुक्यातील सर्वच रस्ते एकमेकांना जोडण्याचे निश्चित केले आहे. कारण रस्त्यांचा विकास हाच तालुक्यांचा विकासाचा मार्ग आहे, असे मत राज्यमंत्र्यांचे आहे. कारण रस्ते चांगले असतील तर शेतकरी, व्यापारी, कारखाने, सामान्य नागरिक तसेच पर्यटक स्वतःचा विकास करतील व राज्यमार्ग उत्तम असतील तर तालुक्याची विकासाची नाळ जिल्हा, राज्य व देश यांच्याबरोबर जोडली जाणार असल्याचे मत श्री. भरणे यांनी व्यक्त केले असून त्याची परिणीती म्हणून राज्यमंत्र्यानी तालुक्यात ११०० कोटींचा विविध विकास कामांचा निधी आणला आहे.
काटी – रेडा रस्ता ३ कोटी रुपये, काटी – निरा भीमा कारखाना रस्ता ६.११ कोटी रुपये, काटी ओढ्यावरील पुल व इतर कामे १ कोटी रुपये तसेच गिरवी येथील ५ कोटी ६२ लाख रुपयांची विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री प्रदीप गारटकर (पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी) हे असून प्रमुख उपस्थितीत श्री.प्रताप पाटील (माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे), श्री प्रवीण माने (माजी आरोग्य सभापती व बांधकाम सभापती जिल्हा परिषद पुणे), मा.श्री.हनुमंत कोकाटे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका), श्री.अभिजीत तांबिले (जिल्हा
सदस्य पुणे),मा. प्रशांत पाटील( ज्येष्ठ नेते रा. काँ. प. इं.तालुका) , मा.सचिन सपकाळ (जिल्हा नियोजन समिती,पुणे), मा.श्री.अतुल झगडे ( कार्याध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर तालुका), ॲड.शुभम निंबाळकर( अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस इंदापूर तालुका)श्रीमती. छाया पडसळकर (अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस इंदापूर तालुका) तसेच मौजे काटी ,रेडा, रेडणी तसेच गिरवी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य पदाधिकारी व अधिकारी ग्रामस्थ व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
मौजे गिरवी येथे ठीक १.००वा. सभेचे आयोजन .व सायं ७:०० वाजता . जाहिर सभा - काटी . ता . इंदापूर येथे केले आहे
टिप्पण्या