इंदापूर:-मध्यान्ह भोजन योजनेतील अनुदानात १०० % वाढ करण्या साठी मा . ना . श्रीमती निर्मला सीतारमन अर्थमंत्री , भारत सरकार यांना राष्ट्रसेवा दला चे निवेदन पाठविण्यात आले, त्या निवेदनाची प्रत तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर यांना देण्यात आले,या निवेदनात विविध विषय मांडण्यात आलेआसल्याची माहीती राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कृष्णाजी ताटे सर यांनी दिली ते पुढे म्हणाले की,
देशातील शाळा - शाळांमधून मुला - मुलींची उपस्थिती वाढावी , गळती थांबावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी भारत सरकाने MDM मध्यान्ह भोजन योजना सुरु केलेली आहे . ही योजना आता प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण या नावाने सुरु होत आहे . केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ या अंदाज पत्रकात या योजनेस १०० % अनुदानाची तरतुद केलेली दिसून येत नाही . उलट कपातच झालेली आहे , ही गंभीर बाब आहे . बहुजन , कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील बहुसंख्य मुलं या योजनेमुळे शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत . मात्र अनुदानात कपात झाल्याने ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाण्याचा धोका निर्माण होतो . तसेच महाराष्ट्रातील आश्रम शाळा अनुदानित वसतिगृहे यांच्यासाठी नारी निकेतन योजनेअंतर्गत गहू , तांदूळ शासनाकडून मिळत होता तो , ई मशीन च्या नावाखाली बंद आहे तो पूर्ववत चालू करावा . तरी कृपया प्रधानमंत्र्यांच्या नावाने सुरु होत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेस १०० % अनुदानाची तरतुद करण्यात यावी,आशी मागणी राष्ट्रसेवादलाच्या वतीने करण्यात आली, या वेळी सेवादल मंडळ सदस्य कृष्णाजी ताटे सर,मार्गदर्शक साथी सलिम शेख, राष्ट्र सेवा दल राज्य कार्यकारिणी सदस्य (महाराष्ट्र) मा.गफूरभाई सय्यद,जिल्हा कोशाध्यक्ष बिभीषण लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश शिंदे,उपस्थित होते,
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संघटक शिवाजीराव मखरे, शिवशाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन दादा आरडे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, वंचित बहुजन आघाडीचे हनुमंतराव कांबळे, प्रमोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, मौर्य क्रांती संघ शहराध्यक्ष प्रकाश पवार,अमोलशेठ मिसाळ,सुनील सोनवणे सह इतर मान्यवर उपस्थित होते,
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या